उत्तर प्रदेशात मुस्लिम सर्वाधिक सुरक्षित, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाची चर्चा
आपल्या देशात हिंदू सुरक्षित आहेत तर मुस्लीमही सुरक्षित आहेत असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तसेच उत्तर प्रदेशात मुस्लिम सर्वाधिक सुरक्षित आहेत असेही योगी म्हणाले.
एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, 100 हिंदू कुटुंबात एक मुस्लीम कटुंब सुरक्षित राहू शकतं. त्यांना आपल्या धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असणार. पण 100 मुस्लीम कुटुंबात हिंदूंचे 50 कुटुंब सुरक्षित नाही राहू शकत. याचे बांगलादेश उदाहरण आहे. यापूर्वी पाकिस्तान हे एक उदाहरण आहे. अफगाणिस्तानमध्ये काय झालं? पुढच्यास ठेच मागचा शहाणा, त्यामुळे आपण शहाणे व्हायला पाहिजे असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम सर्वात जास्त सुरक्षित आहेत. जर हिंदू सुरक्षित आहेत तर मुस्लीमसुद्धा सुरक्षित आहेत. 2017 पूर्वी दंगलीत हिंदूंची दुकानं जळत होती तर मुस्लिमांचीही दुकानं जळत होती. हिंदूंची घरं जळत होती तर मुस्लिमांची घरं जळत होती. 2017 नंतर दंगली बंद झाल्या असा दावाही त्यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List