Salman Khan : सलमान खान हिंदू की मुसलमान ? भाईजान कोणत्या धर्माचे करतो पालन ? स्वत:च केला खुलासा..
Salman Khan Religion : बॉलिवूडचा सुपरस्टार, दबंग कलाकार, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. भाईजानचा हा मोस्ट अवेटेड चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रबटाबद्दल बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटात होळी आणि ईदचे शानदार सेलिब्रेशनही पहायला मिळणार आहे. पण दबंग स्टार, सलमान कोणत्या धर्माचे पालन करतो हे तुम्हाला माहीत आहे का ?
तो कोणत्या धर्माचे पालन करतो, याचा खुलासा खुद्द सलमान खानने केला होता. तेव्हा त्याने सांगितले की तो तीन धर्मांवर विश्वास ठेवतो. खरं तर, 2017 मध्ये काळवीट मारल्याप्रकरणी सुनावणीदरम्यान सलमान खानला त्याच्या धर्माबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा सलमानने खूप कॉन्फिडंटली आणि गर्वाने या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं होतं.
सलमान कोणता धर्म मानतो ?
सलमान खानच्या सांगण्यानुसार, तो मुस्लिम आहे आणि हिंदू धर्मावरही विश्वास ठेवतो. पण एवढंच नव्हे तर तो प्रथम भारतीय आहे आणि तोच त्याच्यासाठी एक धर्म आहे. कोर्टात उत्तर देताना सलमान आधी हिंदीत म्हणाला होता – मी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही आहे. मी भारतीय आहे. यानंतर तो इंग्रजीत म्हणाला – I am Indian.
वडिलांनी काय सांगितलं होतं ?
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचे वडील सलीम खान हेदेखील आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या धर्माविषयी उघडपणे बोलले आहेत. ते एकदा म्हणाले होते की ते मुस्लिम आहेत तर त्याची पत्नी बायको हिंदू आहे, त्यामुळे त्यांची सर्व मुले स्वतंत्र संस्कारांनी वाढलेली आहेत. सलीम खान म्हणाले होते की, त्यांच्या कुटुंबात ईद आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण महत्त्वाचे आहेत.सलमान, हा हिंदू किंवा मुस्लिम समजत नाही, तो फक्त एक माणूस आहे, असं त्यांनी सलमानबद्दल बोलताना नमूद केलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List