15 वर्षांनी लहान अभिनेत्रीसाठी पत्नीलाही सोडायला तयार होता रोहित शेट्टी? कोण आहे ती?
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींमध्ये लव्ह-हेट रिलेशनशिप पहायला मिळतं. इंडस्ट्रीत एका क्षणात ब्रेकअप आणि पॅचअपचे खेळ खेळले जातात. यात केवळ अभिनेता आणि अभिनेत्रीचाच समावेश नसतो. तर कधी दिग्दर्शकसुद्धा चर्चेत येतात. यापैकी काहींनी त्यांचं प्रेम जगजाहीर केलं, तर काहींनी त्यांच्या मनातच ते प्रेम लपवून ठेवलं. असाच एक दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. एकेकाळी रोहित शेट्टी हा अभिनेत्री प्राची देसाईच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची जोरदार चर्चा होती. ‘इंडिया डॉटकॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बोल बच्चन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रोहित प्राचीच्या प्रेमात पडला होता. यामध्ये अभिषेक बच्चन, अजय देवगण आणि असिन यांच्याही भूमिका होत्या.
रोहित आणि प्राची यांच्यात शूटिंगदरम्यान चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. प्राचीसाठी रोहितने जयपूरमध्ये रोमँटिक डिनरचंही आयोजन केलं होतं. इतकंच नव्हे तर रोहित आणि प्राची हे दोघं एकत्रच राहायचे, अशीही चर्चा होतती. 2005 मध्ये रोहितने बँकर मायाशी लग्न केलं होतं. विवाहित असतानाही तो प्राचीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपमध्ये होता. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. या नात्यावर कधीच रोहित किंवा प्राचीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील मसालापटांसाठी ओळखला जातो. ‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘सिंघम अगेन’, ‘गोलमान’ यांसारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलंय.
प्राचीने ‘कसम से’ या मालिकेतून अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली होती. यामध्ये बानीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली होती. मालिकेनंतर तिने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. चित्रपटसृष्टीशी संबंधित कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही प्राचीने स्वत:च्या मेहनतीवर आपलं नाव कमावलं. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘आय मी और मैं’ आणि ‘अजहर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत प्राचीने लग्नाविषयी तिचं मत मांडलं होतं. “माझ्या आईवडिलांनी मला अशा पद्धतीने लहानाचं मोठं केलं, ज्यामुळे मी लग्नाकडे कधीच सुरक्षेची जाळी म्हणून पाहत नाही. जिथे तुमच्या करिअरला उतरती कळा लागली किंवा काही गोष्टी ठीक घडल्या नाही तर लग्नबंधनात अडकायचं”, असं ती म्हणाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List