आमिर खानने 18 महिने जगापासून तिसरे प्रेम कसे लपवले? स्वत: केला खुलासा
पापाराझी सर्व लहान-मोठ्या स्टार्सच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर लक्ष ठेवून असतात. ते कुठे जातात, काय करतात या सर्वच गोष्टी पापाराझीपासून लपत नाहीत. पापाराझी देखील कोणते स्टार्स कोणाला डेट करत आहेत यावर लक्ष ठेवतात. मात्र, आमिर खानने त्याचे लव्ह लाईफ 18 महिने जगापासून लपवून ठेवले. ते कसे शक्य झाले हे आमिरने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
आमिरने ६०वा वाढदिवस साजरा करताना गौरी नावाच्या एका महिलेला डेट करत असल्याचे सांगितले. ती मूळची बंगळूरुची आहे. आमिरने सांगितले की, तो 18 महिन्यांपासून गौरीला डेट करत आहे. याबद्दल सांगताना आमिरने पापाराझींची खिल्लीही उडवली आणि म्हणाला, “हे बघा, मी तुम्हाला काही कळू दिले नाही.”
सर्वांपासून कसे लपवले नाते?
आमिरने हे देखील सांगितले की त्याने गौरीसोबतचे त्याचे नाते 18 महिने सर्वांपासून कसे लपवून ठेवले आणि जगाच्या लक्षातही येऊ दिले नाही. आमिर म्हणाला, “सर्वात आधी तर ती बंगळूरुमध्ये राहाते आणि आणखी काही दिवस ती तिथेच राहणार आहे. म्हणून मी तिला अनेकदा तिकडेच भेटायला जायचो. तिथे मीडिया मॉनिटरिंग कमी आहे. त्यामुळेच आम्ही कोणाच्या नजरेत आलो नाही.”
वाचा: बिनकामाचे वाद उकरून काढून…; मटणाच्या सर्टिफिकेट्सवरुन अभिनेत्याची पोस्ट
गौरी जेव्हा मुंबईत यायची तेव्हा तो आपले नाते कसे लपवायचा याबद्दलही आमिरने सांगितले. आमिरने गौरीची कुटुंबीयांशी आणि मुलांशी ओळख करून दिल्याचे सांगितेल. तो पुढे पापाराझींना म्हणाला, “तुमचे माझ्या घरावर फार कमी लक्ष असते त्यामुळे तुमच्याकडून ही गोष्ट मिस झाली.”
आमिरची तिसरी गर्लफ्रेंड
आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत तर दुसरे लग्न किरण रावसोबत केले आहे. मात्र, आमिरने दोघांपासून घटस्फोट घेतला. आता आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. आमिर आणि गौरी दोघेही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. आता दोघेही लग्न करू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List