सेल्फीच्या नादात चाहत्याने दिला काजोलच्या पायावर पाय, काजोलने जी रिअॅक्शन दिली…

सेल्फीच्या नादात चाहत्याने दिला काजोलच्या पायावर पाय, काजोलने जी रिअॅक्शन दिली…

आपल्या आवडीच्या सेलिब्रिटींना पाहण्यासाठी,त्यांची ऑटोग्राफ घेण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी चाहते किती धडपडत असतात. एअरपोर्टवर सेलिब्रेटी स्पॉट झाले की मग त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी होते. अशावेळी मग कलाकारही चाहत्यांचं प्रेमाची बाजू समजून ती परिस्थिती सांभाळून घेतात. पण काहीवेळेला कलाकारांना विचित्र अनुभव देखील आले आहेत. सेलिब्रिटींसोबतचे चाहत्यांचे किस्से बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक किस्सा घडला आहे अभिनेत्री काजोलसोबत. सध्या काजोलच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. यावेळी काजोलसोबत फोटो घेताना एका वृद्ध व्यक्तीचा तिच्या पायावर पाय पडला.

काजोलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

काजोलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक वृद्ध व्यक्ती तिच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत असल्याचं दिसत आहे. पण यासगळ्या गडबडीत तो व्यक्ती जेव्हा सेल्फी घेण्यासाठी तिच्याजवळ जातो तेव्हा त्याचा पाया हा काजोलच्या पायावर पडतो. वयोवृद्धाचा पाय पायवर पडताच काजोल लगेचच मागे होते. त्यानंतर ती संयमाने त्याला ऑटोग्राफ आणि सेल्फीही देते. त्यावेळी काजोलने दाखवलेला संयमी स्वभाव पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. काजोलने तिच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


चाहत्याचा काजोलच्या पायावर पाय पडला 

काजोल गुरूवारी, 13 मार्चला वांद्रे येथील एका सलून बाहेर आल्यानंतरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफ ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये काजोल जेव्हा सलून बाहेर येत असतानाच हा किस्सा घडला आहे. पण यावेळी काजोलने न चिडता दाखवलेल्या संयमाचं नेटकरी खरंच कौतुक करत आहेत.

लवकरच ती हॉरर चित्रपट Maa मध्ये झळकणार

दरम्यान, काजोलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती हॉरर चित्रपट Maa मध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूचार्वी या चित्रपटाचा पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. काजोलचा ‘मां’ हा आगामी चित्रपट 27 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोलसह रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि खेरिन शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

सध्या काजोलवर शोककळा पसरली आहे कारण तिचे सख्खे काका देब मुखर्जी यांचे वयाच्या 81 साव्या वर्षी निधन झाले आहे. देब हेदेखील अभिनेते होते. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध डिरेक्टर अयान मुखर्जीचे ते वडील होते. काजोलचे वडील शोमु मुखर्जी हे अयान मुखर्जीचे सख्खे काका. शोमु मुखर्जी हे बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक होते. त्यांचे 2008 मध्ये निधन झाले. देब मुखर्जी यांची मुलगी सुनीत गोवारीकर आहे. ज्या आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नी आहेत.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन… डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास