गोविंदा – सुनीता यांचा खरंच होतोय घटस्फोट? अभिनेत्याच्या बहिणीने सोडलं मौन
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. अनेक सेलिब्रिटींना घटस्फोटाची अधिकृत घोषणा देखील केली. अशात अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा तुफान रंगल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर अद्याप गोविंदा आणि सुनीता यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्याची बहीण कामिनी खन्ना यांनी मौन सोडलं आहे. रंगणाऱ्या अफवांवर कामिनी खन्ना यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या एक मुलाखतीत कामिनी खन्ना यांनी घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
कामिनी खन्ना म्हणाल्या, ‘मी माझ्या कामात व्यस्त असते. ते (गोविंदा आणि सुनीता) देखील त्यांच्या कामांमध्ये व्यस्त असतात. आमचं भेटणं फार कमी होतं. त्यामुळे याबद्दल मला अधिक काही माहिती नाही. मला या विषयावर जास्त काहीही बोलायचं नाही… कारण हा दोन कुटुंबाचा प्रश्न आहे आणि मी दोन्ही कुटुंबावर प्रेम करते…’ असं अभिनेत्याची बहिणी म्हणाली.
एवढंच नाही तर, सुनीता यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील कामिनी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जगात आमचे आई-वडील नाही. म्हणून आम्ही एकमेकांना आमचे आई – वडील मानतो. आमच्यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत.’ त्यामुळे आता गोविंदा आणि सुनीता यांचा घरंच घटस्फोट होणार आहे का? यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाला गोविंदा?
रिपोर्टनुसार, गोविंदाला घटस्फोटाबद्दल विचारण्यात येताच अभिनेता म्हणाला, ‘सध्या व्यवसायाबद्दल बोलणं सुरु आहे. मी माझा सिनेमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे…’ असं म्हणत अभिनेत्याने घटस्फोटाबद्दल बोलणं टाळलं.
गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत ‘प्रेमसंबंध’?
काही सूत्र आणि मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केला आहे की गोविंदाच्या 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे हे प्रकरण या पातळीवर पोहोचले आहे. पण ही मराठी अभिनेत्री कोण आहे? याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. तिचं नाव देखील समोर आलेलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List