आमिर खान आणि त्याच्या नव्या गर्लफ्रेंडच्या वयात इतक्या वर्षांचं अंतर
अभिनेता आमिर खानने त्याच्या 60 व्या वर्षी गर्लफ्रेंडची सर्वांना ओळख करून देऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. दोनदा लग्न आणि दोनदा घटस्फोट झाल्यानंतर आमिर आता त्याच्या एक मैत्रिणीला डेट करत आहे. आमिर खानच्या या नव्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्प्रॅट असं आहे.
आमिर आणि गौरी हे दोघं गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि गेल्या 18 महिन्यांपासून तते एकमेकांना डेट करत आहेत. गौरी ही बेंगळुरूची असून तिथे तिचं सलॉन आहे.
लिंक्ड इन प्रोफाइवरील माहितीनुसार, गौरीने ब्लू माऊंटन स्कूलमधून शिक्षण घेतलंय. त्यानंतर तिने लंडनमध्ये एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफी फॅशनचा कोर्स केला. तिचं मुंबईतही 'बी ब्लंट' नावाने सलॉन आहे. गौरीला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List