त्वचेपासून ते आरोग्यापर्यंत ‘या’ पाच प्रकारे एरंडेल तेल फायदेशीर
त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खराब केस आणि त्वचा तुमचा लुक खराब करू शकतात. यासाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर मानले जाते. हे एरंडेल तेल अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि ते खूप प्रभावी देखील आहे. हे तेल त्वचेसाठी तसेच आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बऱ्याच काळापासून वापरले जातात. एरंडेल तेलाचा वापर अनेक उत्पादनांमध्ये देखील केला जातो आणि आयुर्वेदात हे तेल अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याचे देखील म्हटले आहे.
एरंडेल तेलामध्ये एक नैसर्गिक लॅक्सेटिव असते आणि त्यात इतर अनेक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. तथापि, हे तेल आरोग्यासाठी वापरताना फक्त तज्ञांच्या सल्ल्यानेच सेवन करावे, कारण काही मेडिकल परिस्थितींमध्ये एरंडेल तेलाचे सेवन टाळण्याची आवश्यकता असते. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने एरंडेल तेल वापरावे. या व्यतिरिक्त या तेलाचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया.
सांधेदुखीपासून आराम
एरंडेल तेल सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी एरंडेल तेलाचा वापर करताना नेहमी कोमट करूनच स्नायूना लावावे. हे तेल दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने त्याद्वारे मालिश केल्यास तूमच्या स्नायूंची सूज कमी होण्यास मदत होते आणि आराम मिळतो.
त्वचेसाठी फायदेशीर
एरंडेल तेल त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुम्ही जर त्वचेला एरंडेल तेल लावल्यास हे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि पोषण देते. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते आणि चेहरा तरुण दिसतो. तुम्ही हे तेल थेट त्वचेवर लावू शकता किंवा मॉइश्चरायझिंग गुणधर्म असलेल्या तेलात मिक्स करून सुद्धा त्वचेला लावू शकता.
केस लांब आणि जाड होतात
एरंडेल तेलाने डोक्याला मसाज केल्यानंतर, कमीत कमी दोन तासांनी शॅम्पू करावा. जर तुम्ही ते नियमितपणे लावले तर केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ देखील सुधारते.
बद्धकोष्ठतेसाठी एरंडेल तेल
ज्या लोकांना अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या सतावत असते. त्यांच्यासाठी एरंडेल तेल देखील खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत एरंडेल तेलाचे एक-दोन थेंब मिक्स करून घ्यावे. अधिक प्रमाणात याचे सेवन करू नका अन्यथा तुम्हाला दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल.
हे देखील फायदे आहेत
एरंडेल तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्याचबरोबर डोळ्यांसाठी देखीन एरंडेल तेल फायदेशीर आहे. हे तेल केसांमधील कोंडा कमी करते आणि केसांची चमक वाढवते. याशिवाय, एरंडेल तेल पिगमेंटेशन, काळे डाग कमी करण्यास आणि सुरकुत्या रोखण्यास देखील उपयुक्त आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List