“बॉडीबिल्डर नाही तर बारिक मुलंच..”; वर्षभरापूर्वीच महवशने चहलसोबतच्या नात्याची दिली हिंट?
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि आरजे महवश या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धनश्रीला घटस्फोट दिल्यानंतर युजवेंद्र महवशला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या अफेअरच्या चर्चांदरम्यान महवशचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये महवश सांगतेय की मुलींना कोणत्या प्रकारची मुलं आवडतात? मुलींना बॉडीबिल्डरपेक्षा बारिक मुलंच जास्त आवडतात, असं महवश या व्हिडीओत म्हणतेय. हा तिचा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा आहे.
या व्हिडीओमध्ये महवश म्हणते, "मी असं काही म्हणणार आहे, जे प्रसिद्ध नाही. मुलींना बॉडीबिल्डर मुलांच्या तुलनेत बारिक मुलंच जास्त आवडतात. प्रत्येक मुलीला बॉडीबिल्डरच हवा असं गरजेचं नाही. जी मुलं सोशल मीडियावर आपली बॉडी दाखवतात, तीच मुलं नेहमी वैयक्तिक मेसेज करून टिप्स मागतात."
मुलींचीही आवड-निवड आता बदलली आहे. डेटवर आता मुलीसुद्धा उकडलेली अंडी किंवा उकडलेल्या भाज्या ऑर्डर करत नाहीत तर मोमोजची प्लेट ऑर्डर करतात", असंही ती या व्हिडीओत म्हणतेय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List