राज्याच्या लालपरीची झोळी रिकामीच, बजेटमध्ये शिळ्या कडीला ऊत, युनियन नेत्याची टीका

राज्याच्या लालपरीची झोळी रिकामीच, बजेटमध्ये शिळ्या कडीला ऊत, युनियन नेत्याची टीका

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक संकटात आहे. एकीकडे गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकाने त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अत्याधुनिक बस स्थानके आणि गाड्यांची तजवीज करीत असताना महाराष्ट्राच्या अर्थंसंकल्पात एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी कोणतीही तजवीत केलेली नाही. केवळ सहा हजार एसटी डिझेल गाड्यांनी सीएनजी आणि एलएनजीमध्ये परावर्तित करण्याच्या जुन्या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. एसटीच्या नवीन गाड्यांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद किंवा नियोजन या अर्थसंकल्पात केलेले नाही. एसटी महामंडळाची या अर्थसंकल्पाकडून निराशा झाला झाली असून एसटीची झोळी पुन्हा एकदा रिकामी राहील्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटीची सर्व प्रकारची थकीत देणी चुकती करण्यासाठी तसेच नवीन गाड्या घेण्यासाठी विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पात एसटीसाठी आर्थिक मदत पॅकेज मिळेल असे वाटत असतानाच पुरेसा निधी उपलब्ध केलेला नाही. एसटीला नवीन गाड्या घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती स्पष्टता दिसत नाही त्यामुळे एसटीची झोळी अखेर रिकामीच राहिली असल्याचे मत मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

गाड्यांसाठी २००० कोटींची गरज

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या ताफ्यात स्व मालकीच्या नवीन ५००० गाड्या घेण्यासाठी आणि सहा हजार कोटीची थकीत रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे वाटत होते पण तसे काहीही झालेले नाही. थकीत रक्कम देण्यासाठी निधी देण्यात आला नसून स्व मालकीच्या नवीन गाड्या घेण्यासाठी किती निधी देणार या बाबतीत स्पष्टता नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेल्या ५००० गाड्या विकत घेण्यासाठी २००० कोटी रुपयांची गरज असून त्या बाबतीत स्पष्टता दिसत नाही.

महामंडळाची एकूण थकीत देणी!

या वर्षात ५००० नवीन गाड्या घेण्याची घोषणा करण्यात आली होती, त्या साठी किमान २००० कोटी रुपयांची गरज होती.

सरकार कडून न प्राप्त झालेली गेल्या वर्षीची तुटीची रक्कम ९९३ कोटी ७६ लाख रुपये इतकी आहे.

सन १/४/२० ते १/४२४ या कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ फरकाची रक्कम २३१८ कोटी रुपये इतकी प्रलंबित आहे…

थकीत महागाई भत्ता रक्कम १५० कोटी रुपये

पी. एफ. थकीत रक्कम ११०० कोटी रुपये

उपदान म्हणजेच ग्राजुटी थकीत रक्कम ११५० कोटी रुपये

एसटी बँक थकीत रक्कम १५० कोटी रुपये

एल आय सी थकीत रक्कम १० कोटी रुपये

रजा रोखिकरण थकीत रक्कम ६० कोटी रुपये

वैद्यकीय प्रतिपूर्ती थकीत रक्कम १० कोटी रुपये

डिझेल थकीत रक्कम १०० कोटी रुपये

भांडार देणी थकीत रक्कम ८० कोटी रुपये

पुरवठादार कंपनी थकीत देणी रक्कम ५० कोटी रुपये

अपघात सहाय्यता निधी थकीत रक्कम ३ कोटी रुपये

वरील सर्व बाबींसाठी ७००० कोटी रुपयांची गरज असून त्या बाबतीत स्पष्टता दिसत नाही…
याचाच अर्थ देणी थकीत राहणार आहेत.

एकुणच यंदाच्या या अर्थसंकल्प २०२५ मध्ये एसटीसाठी विशेष काहीही तरतूद केल्याचे दिसत नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली “बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली
राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी IIFA Awards 2025 मध्ये दिसले. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9...
भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचा छापा, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवरच काढला राग
महाझुटी सरकारचा स्वप्नदर्शक आणि बोगस अर्थसंकल्प; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Maharashtra Budget 2025 : सरकारने निराशा केली, सभगृहात आवाज उठवणार – उत्तम जानकर
ऑनलाईन वेट लॉस प्लान जीवावर बेतला, डाएटच्या अतिरेकामुळे 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प; अंबादास दानवेंची टीका