या औषधाने करण जोहरने 4 महिन्यांत 17 किलो वजन कमी केलं? करणने अखेर खुलासा केलाच

या औषधाने करण जोहरने 4 महिन्यांत 17 किलो वजन कमी केलं? करणने अखेर खुलासा केलाच

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे, तसेच त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण तो गेल्या काही दिवसांपासून अजून  एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याने कमी केलेलं वजन. त्याच्या अचानक कमी झालेल्या वजनाची चर्चा चाहत्यांपासूनच बॉलिवूडमध्येही होताना दिसत आहे. करण जोहरने अचानक बरंचसं वजन कमी केलं आहे आणि आता तो पूर्वीपेक्षा जास्त तंदुरुस्त दिसत आहे. त्याचे परिवर्तन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
करणने सांगितलं त्याचं वजन कमी करण्याचं सिक्रेट
पण आता करणने त्याचं हे सिक्रेट सांगून टाकलं आहे. 52 वर्षांच्या करणने अवघ्या चार महिन्यांत 17 किलो वजन कसं कमी केलं याबद्दल सांगितलं आहे. निरोगी आहार, योग आणि वर्कआउट्सद्वारे त्याने फिटनेस मिळवल्याचं सांगितलं आहे. आयफा 2025 मध्ये  करण जोहरने त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला. आयफा 2025 साठी बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार जयपूरला पोहोचले होते. करणचीही उपस्थिती होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

निरोगी राहण्यासाठी करण काय करतो?
यादरम्यान, ग्रीन कार्पेटवर माध्यमांशी बोलताना, त्याने त्याच्या या परिवर्तनाबद्दल सांगितले, तो म्हणाला की, ‘योग आणि योग्य आहार हे निरोगी राहण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी सर्वोत्तम आहे.’ यातून मी स्वतःला बदलले आहे. जेव्हा एका पत्रकाराने त्याला त्याच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल विचारलं तेव्हा करण म्हणाला, ‘जर माझा दिनक्रम सांगायचं झालं तर मग मी माझं सीक्रेट सांगिल्यासारखं होईल’ असं म्हणत त्याने त्याची दिनचर्या सांगणं टाळलं.
करण जोहर खरंच हे औषध घेतो?
करण जोहर ओझेम्पिक म्हणजेच (वजन कमी करणारे औषध) वापरल्याचा आरोप होता करण्यात आला होता. 2014 मध्ये, नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमध्ये, अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने ओझेम्पिक सारख्या औषधाचा उल्लेखही केला होता. यानंतर लोकांनी करण जोहरवर आरोप केले होते.
लोकांचा असा विश्वास होता की करणने देखील वजन कमी करण्यासाठी हेच औषध वापरलं आहे. कारण एवढ्या कमी वेळात एवढं वजन कसं काय कमी होऊ शकतं? असा प्रश्न लोकांना पडला होता.  पण आता करणने स्वतः या अफवांना नकार दिला आहे आणि म्हटले आहे की त्याने निरोगी आहार आणि चांगल्या दिनचर्येमुळे त्याचे वजन कमी केलं आहे. आता यातील नेमकं काय खरं आहे ते मात्र खात्रीने सांगणं कठीण आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा...
Maharashtra Budget: छावा चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पोहचला, आता अर्थसंकल्पात महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा
अर्थसंकल्प 2025 : अजितदादांच्या 15 घोषणा काय आहेत पहा ?
Maharashtra Budget: लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार…
Maharashtra Budget: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होणार? अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा
Maharashtra Budget: अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लाडक्या बहिणी अन् पुन्हा आलो, पुन्हा आलो…
माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा…अमिताभ यांचे प्रॉपर्टीविषयी वक्तव्य; कोट्यवधींची संपत्ती नेमकी कोणाला मिळणार?