बच्चन कुटुंब आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये 30 वर्षांपासून कट्टर शत्रूत्व; एकत्र काम न करण्याची घेतली शपथ

बच्चन कुटुंब आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये 30 वर्षांपासून कट्टर शत्रूत्व; एकत्र काम न करण्याची घेतली शपथ

बॉलिवूडमध्ये जशी चर्चा ही अफेअर्स, लग्न, घटस्फोट याबाबत असते तशीच चर्चा ही सेलिब्रिटींची एकमेकांसोबतची स्पर्धा, मैत्री, शत्रुत्वाचीही तेवढीच असते. त्यातही मैत्रपेक्षाही शत्रुत्वाची जास्त चर्चा असते. कधीकाळी एकमेकांची जिवलग म्हणवून घेणारे मित्र आज एकमेकांचे कट्टर शत्रूही होतात. असं अभिनेत्यांमध्ये आणि अभिनेत्रींमध्येही होताना दिसतं. अनेकजण तर एकाच इंडस्ट्रीत असून एकमेकांचं तोंडही पाहत नाही.

हा बॉलिवूड अभिनेता बच्चन कुटुंबाचा तिरस्कार करतो

बॉलिवूडमधल्या एकमेकांमध्ये असलेल्या या शत्रुत्वाच्या यादीत असं एक नाव आहे ज्याचे चक्क बच्चन कुटुंबाशी वाद आहेत. होय, हा बॉलिवूड अभिनेता बच्चन कुटुंबाचा तिरस्कार करतो. बच्चन कुटुंब आणि या अभिनेत्यामध्ये गेल्या 30 वर्षांपासून हे वैर असचं आहे. हे शत्रूत्व एवढं वाढत गेलं की त्यांनी एकत्र काम न करण्याची शपथ घेतली आहे.

त्या अभिनेत्याचं नाव आहे सनी देओल. बच्चन कुटुंब आणि सनी देओल यांच्यातील हे वैर इतक्या टोकापर्यंत आहे की मागील 30 वर्षात त्यांनी एकत्र काम केलेलं नाही. कधी काळी एका चित्रपटात सनी देओल आणि अमिताभ यांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्यात जे बिनसलं त्यानंतर पुन्हा ते एकत्र दिसले नाहीत. बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय यांचं नाव घेतलं जातं तेव्हा अनेकांना सलमान खान किंवा विवेक ओबेरॉय यांच्याशीच शत्रुत्व असावं असं वाटतं. पण तसं नसून सनी देओल आणि बच्चन कुटुंबातील वैर चर्चेत आहे. अमिताभ आणि धर्मेंद्र हे जिवलग मित्र असूनसुद्धा अमिताभ बच्चन आणि सनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून त्यांच्यात कोणताही संवाद नाही.

सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्यातील वाद 

30 वर्षांपूर्वी 1994 मध्ये ‘इन्सानियत’ हा चित्रपट आला होता. त्यात सनी आणि अमिताभ एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. आपला जिवलग मित्र धर्मेंद्रचा मुलगा असल्याने अमिताभ बच्चन यांचे सनी देओलवर स्वतःच्या मुलासारखे प्रेम होतं, असं म्हटलं जातं, पण सनीची वाढती फॅनफॉलोईंग पाहाता अमिताभ थोडेसे चिंतेत होते. या चित्रपटानंतर सनी देओल आणि अमिताभ बच्चन कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

अमिताभ सनीला प्रतिस्पर्धी मानू लागले होते

अमिताभ बच्चन सनी देओलच्या नव्या स्टारडमबद्दल थोडे घाबरू लागले होते आणि त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर वातावरणात काही बदल झाले होते असं म्हटलं जातं. IMDB च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानंतर सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्यात अनेक गैरसमज झाल्याचं म्हटलं जातं. अमिताभ सनीला आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानू लागले होते.

एकत्र काम न करण्याची शपथ घेतली

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अमिताभ यांची भूमिका लहान होती, मात्र नंतर ती मोठी करण्यात आली. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देखील सनीला दुर्लक्षित करत अमिताभ यांच्याकडे जास्त लक्ष देण्यात आलं होतं. या सर्व घडामोडींनंतर सनी देओलने अमिताभ यांच्यासोबत काम न करण्याची शपथ घेतली. याशिवाय अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे बच्चन कुटुंब आणि सनी देओलमधील वादही वाढत गेले.

अभिषेक-ऐश्वर्यासोबतही का बिनसलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी सनी देओलला आणखी एक चित्रपट बनवण्याचं आश्वासन दिलं होत. पण जेव्हा त्याने ‘LOC: कारगिल’ हा सिनेमा बनवला तेव्हा त्यांनी सनी देओलच्या जागी अभिषेक बच्चनला सिनेमात घेतलं. यामुळे सनी देओल जेपी दत्ता यांच्यावर रागावला आणि अभिषेकपासूनही दूर राहू लागला. इतकंच नाही तर सनी देओलने बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनसोबत एका चित्रपटातही काम केलं होतं. पण तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.

1997 मध्ये सनी देओल आणि ऐश्वर्या ‘इंडियन’ चित्रपटात एकत्र दिसणार होते, मात्र हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. दोघांनीही या चित्रपटासाठी गाणी शूट केलीही होती. त्यामुळेही अनेक गोंधळ निर्माण झाले होते. या सगळ्या घडामोडींनंतर सनी आणि बच्चन कुटुंब एकमेकांचे कट्टर शत्रूच झाले असं म्हटंल तर चुकीचं ठरणार नाही.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते....
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती
झोपण्यापूर्वी हे पाणी प्या… चमत्कारीक फायदे ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल; वस्तू छोटी पण…
IND Vs PAK – टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 6 गडी राखून दणदणीत विजय
राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल; विद्यार्थ्यांवर अन्याय?