‘बाबू काबूच्या बाहेर असतो, महिन्यातून किमान 20 वेळा तरी…’ ; प्रसिद्ध अभिनेत्रीनेच कास्टिंग काऊचबाबत सगळं सांगितलं
अक्षरा सिंह ही भोजपुरी चित्रपटातील सध्याच्या घडीची टॉपची अभिनेत्री आहे. तिने आपल्या मेहनतीच्या बळावर भोजपुरी चित्रपट इंड्रस्ट्रीमध्ये तगडं स्टारडम मिळवलं आहे. इंन्स्टाग्रामवर तिचे 67 लाखांपेक्षा जास्त फॉलवर्स आहेत. अक्षरा सिंह ही एकेकाळी भोजपुरी चित्रपटाचा स्टार अभिनेता पवन सिंह याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये देखील होती. मात्र काही कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णय घेतला. तीने आपल्या अनेक मुलाखतीदरम्यान पवन सिंह याच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत, आता तीने भोजपुरी सिनेमांमध्ये कास्टिंग काऊच कशाप्रकारे होतं? हे सांगताना अनुभव कथन केला आहे.
कास्टिंग काऊच बाबत बोलताना एका मुलाखतीमध्ये अक्षरा सिंहने म्हटलं की, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शोषण सुरू आहे. प्रत्येक फिल्डमध्ये शोषण होत आहे. जर तुम्ही फिल्म इंडस्ट्रीबाबत बोलत असाल तर हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर ठरवलं की मला कॉप्रोमाईज करायचंच नाही तर जगातील कोणतीही ताकत तुम्हाला अडवू शकणार नाही, मात्र तुम्हीच त्याची निवड करतात, मग प्रश्न असा आहे की तुम्ही कॉप्रोमाईज का करता? प्रत्येकाची निवड असते, ज्यांना कॉप्रोमाईज करायचं ते करतात, ज्यांना आपल्या तत्वांवर ठाम राहायचं आहे, ते ठाम राहातात.
यावेळी अक्षराला असा देशील प्रश्न विचारला की, तुम्ही जर कॉप्रोमाईज केलं नाही तर तुम्हाला चित्रपटात कमा मिळत नाही, हे खरं आहे का? यावर बोलताना ती म्हणाली की, इथे कॉप्रोमाईज होत नाही इथे थेट प्रेम होतं. महिन्यातून किमान वीस वेळा तरी प्रेम होतं. नंतर ब्रेकअप होतं. त्यानंतर सर्व दोष मुलींच्याच माथी मारले जातात. मुलीचीच चूक सांगितली जाते. पुढे बोलताना ती म्हणाली की इथे इमोशन देखील असतं. मुली भावनिक होतात, सर्वांना वाटतं प्रेम करावं, नवीन-नवीन प्रेमात पडलेल्या मुलीला वाटतं ‘आले मेला बाबू मुझे प्याल कल लहा है’ पण बाबू केव्हाच काबूच्या बाहेर झालेला असतो. फिल्म इंड्रस्ट्रीमध्ये ही गोष्ट तुम्हाला सगळीकडेच पाहायला मिळते. असं अक्षरानं यावेळी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List