Rohit Sharma: लग्नाआधी 3 मुलींशी जोडलं गेलंय रोहितचं नाव, अफेअरनंतर मॅनेजरसोबतच…
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार रोहित शर्माचं सर्वत्र कौतुक होत आहे. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आणखी एक मोठं विजेतेपद मिळवून दिलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाच्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या देखील तुफान चर्चा रंगलेल्या असतात.
रोहित शर्मा देखील त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. रोहित आता पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत असला तरी, एक काळ असा होता जेव्हा अभिनेता त्याच्या अफेअरमुळे तुफान चर्चेत राहिला. पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी रोहित याने तीन मुलींना डेट केलं होत.
लग्न करण्यापूर्वी रोहित शर्मा याने बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात हिला डेट केलं होतं. 2012 मध्ये खुद्द सोफिया हिने रोहित याच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा खुलासा केला.
कॉलेजमध्ये असताना देखील रेहित शर्माच्या आयुष्यात एक मुलगी होती. रोहित याने वर्गातील मैत्रिणीला प्रपोज देखील केलं होतं. पण कॉलेजमधील प्रेमाचा कॉलेज संपल्यानंतर अंत झाला. स्ट्रगल करताना रोहितला त्याची हैदराबादमधील एक मैत्रीण भेटली. ती रोहितची फॅमिली फ्रेंड होती. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर होते पण काही काळानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले.
तीन मुलींसोबत नात्याच्या चर्चा रंगल्यानंतर रोहित आणि रितिका यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. रितिका स्पोर्ट्स मॅनेजर होत आणि ती रोहितची क्रिकेट मॅनेजर म्हणून काम करत होती. याच दरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रोहीत आणि रितिका यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोहितने मुंबईच्या बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये गुडघ्यावर बसून आणि हातात अंगठी घेऊन रितिकाला प्रपोज केलं. यानंतर रितिकाने रोहितचा प्रस्ताव लगेचच स्वीकारला.
रोहित आणि रितिका यांनी 13 डिसेंबर 2015 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर रोहित आणि रितिका यांनी चिमुकलीचं जगात स्वागत केलं. त्यांच्या मुलीचं नाव समायरा असं आहे. तर गेल्या वर्षी रितिका हिने मुलाला जन्म दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List