समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर

समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर

मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांचं वेगळंच स्थान आहे आणि आता या यादीत आणखी एक जबरदस्त चित्रपटाची भर पडतेय ती म्हणजे ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध व्हिएफक्स डिझायनर अनिकेत साने यांनी केलंय तर कल्पना फिल्म्स अँड व्हिएफएक्स स्टुडिओने सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘जंगलबुक’ या हॉलिवूडपटासारखा मराठीतही एक सिनेमा व्हावा असा अनिकेत यांनी यावेळी प्रयत्न केला आहे. तब्बल १० वर्षांच्या रिसर्च आणि मेहनतीनंतर हा प्रोजेक्ट उभा राहिलाय. रामदास स्वामींच्या चरित्रावर भरपूर संशोधन करून आणि ‘दासबोध’ चा सखोल अभ्यास करून या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली.

साने यांनी या प्रोजेक्टसाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच पुढाकार घेत, हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण त्यांचा निर्धार अढळ राहिला.

अनिकेत साने हे नाव व्हिएफक्स डिझायनिंगमध्ये मोठं आहे. त्यांनी ‘सनी’, ‘झिम्मा २’, ‘नवरा माझा नवसाचा २’ यांसारख्या सुपरहिट मराठी सिनेमांसाठी व्हिएफक्स केलंय. तसंच ‘गांधी टॉक्स’, ‘सनक’, ‘केरला स्टोरी’ यांसारख्या हिंदी सिनेमांसोबतच, ‘दिल बेकरार’, ‘सनफ्लॉवर १’ या वेबसीरिजमध्येही त्यांनी योगदान दिलंय.

या अनुभवाचा पुरेपूर वापर करून, त्यांनी ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ मध्ये जबरदस्त व्हिएफक्स आणि ऐतिहासिक दृश्यं निर्माण केली आहेत. चित्रपटाच्या टिझरमध्ये सज्जनगड, काळाराम मंदिर,जांब समर्थ आणि इतर ऐतिहासिक स्थळं व्हिएफक्सद्वारे अगदी हुबेहुब साकारण्यात आली आहेत. यामुळे प्रेक्षकांना १६ व्या शतकात गेल्याची अनुभूती नक्की होते.

सिनेमाबद्दल बोलताना अनिकेत साने म्हणतात की, “‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक जागर आहे. त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आणि त्यांची शिकवण आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवणं हा माझा मुख्य उद्देश आहे.” समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अबू आझमींकडून औरंगजेबचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी समोर, थेट बंदूक काढत धमकवले अबू आझमींकडून औरंगजेबचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी समोर, थेट बंदूक काढत धमकवले
Samajwadi Party leader Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी
वडील कर्नाटकचे डीजी, स्वत: अभिनेत्री; तरीही केली 15 किलो सोन्याची तस्करीत
नॉनवेज खाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय…; रुबिना दिलैकने फराह खानला चिकन सोडण्याचा सल्ला का दिला?
अंकिता लोखंडेचं स्वयंपाकघरही इतकं लॅवीश; 2 एसी अन्… बरंच काही; फराह खानही अवाक्
शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस
फक्त चिमूटभर हिंग आहे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा! वाचा हिंगाचे महत्त्व