गुगल कर्मचाऱ्यांना 60 तास कामाचा सल्ला
गेल्या वर्षी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना आठवडय़ाला 70 तास काम करण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच एल ऍण्ड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांनीही कर्मचाऱ्यांना आठवडय़ाला 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता खुद्द गुगलनेच चॅटजीपीटी आणि मायक्रोसॉफ्टचा धसका घेत कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याची विनंती केली आहे. गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी कर्मचाऱ्यांना तसा मेमो पाठवला आहे.
सर्गेई ब्रिन यांनी आठवडय़ाच्या प्रत्येक दिवशी ऑफिसला येऊन काम करण्याचा सल्ला दिला आहे. सर्गेई बिन यांनी गुगलच्या एआय मॉडेल्स आणि ऍप्लिकेशन्सच्या लाइनअप जेमिनीला उद्देशून लिहिलेल्या मेमोमध्ये आठवडय़ाला 60 तास काम करून उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आहे. ‘स्पर्धा लक्षणीयरीत्या तीव्र झाली आहे आणि आर्टिफिशल जनरल इंटेलिजन्सची अंतिम शर्यत सुरू आहे. मला वाटते की शर्यत जिंकण्यासाठी आपल्याकडे सर्व घटक आहेत, परंतु आपल्याला आपल्या प्रयत्नांना अधिक गती देण्याची गरज आहे’, असे ब्रिन यांनी मेमोमध्ये लिहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांनी अधिक तास काम करावे यावर उघडपणे आपापली मते मांडली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List