यांना एवढी मस्ती येण्याचे कारण म्हणजे राजसत्तेकडून मिळालेले संरक्षण, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची संतप्त पोस्ट
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. या प्रकरणी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा तब्बल 84 दिवसांनी राजीनामा घेण्यात आला. या घटनेवरून महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आरोपींना फटकारले आहे.
आदर्श सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येबद्दल ऐकून आपले मन सुन्न होत होते पण आता त्या घटनेचे प्रत्यक्ष फोटो बघून मानवते वरून विश्वास च उडाला आहे. एवढ्या क्रूरतेने राक्षस ही कधी वागले नसतील.
एवढी मस्ती येण्याचे कारण म्हणजे यांना असलेले राजसत्तेच संरक्षण अरे माणूस…
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) March 4, 2025
”आदर्श सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येबद्दल ऐकून आपले मन सुन्न होत होते पण आता त्या घटनेचे प्रत्यक्ष फोटो बघून मानवतेवरून विश्वासच उडाला आहे. एवढ्या क्रूरतेने राक्षस ही कधी वागले नसतील. एवढी मस्ती येण्याचे कारण म्हणजे यांना असलेले राजसत्तेच संरक्षण. अरे माणूस म्हणून जन्माला आला तर माणसासारखे वागा ना पशू ही असे वागणार नाही जसे तुम्ही वागले आहात. तुमच्या पापाचा घडा भरला आहे हे नक्की”, असे ट्विट केले आहे.
या ट्विटसोबतच त्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीचीच शिक्षा लगेच कशी होईल हे सरकारने बघावे अशी मागणी केली आहे. ”सरकारने या दोषींना भर चौकात जसे आखाती देशात कडक शिक्षा देतात तशी द्यावी जेणेकरून इथून पुढे असे पाप करण्याची हिंमत कोणी करणार नाही. हे फोटो बघून जनतेच्या मनात प्रक्षोभ आहे हे सरकारने ओळखावे. या सर्वांना फाशीचीच शिक्षा लगेच कशी होईल हे सरकारने बघावे आणि हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवून न्याय द्यावा”, अशी मागणी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List