धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कधी?

धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कधी?

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दबाव वाढल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधानभवनमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. तर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

धडधडीत पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत असतील तर…, संजय राऊत यांनी फटकारले

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि माणिकराव कोकाटे यांच्या घोटाळ्यानंतर राज्यातील महायुती सरकारवर आणि दबाव वाढला. अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे राजीनामा स्वीकारून मंत्री धनंजय मुंडे यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Santosh Deshmukh case- अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा; महाराष्ट्रात उसळलेल्या संतापानंतर सुरू झाल्या हालचाली

कोकाटेंचा राजीनामा कधी?

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. महायुतीचे दोन-दोन गुंडे, कोकाटे-मुंडे! अशा घोषणा विधान भवनाबाहेर महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आली आहे, असं...
विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, वाल्मिक कराडने कुणाला केला पहिला फोन; सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप
MP Sanjay Raut News : ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल
शक्ती कपूरवर आली मुंबईतील घर विकण्याची वेळ, काय आहे नेमकं कारण?
‘तारक मेहता..’मधील अय्यर खऱ्या आयुष्यात आजही सिंगल; लग्नाबद्दल म्हणाला..
31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ! अक्षयने स्पर्श करताच जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
“गर्भपात नाही केला तर..”; वन नाईट स्टँडनंतर प्रेग्नंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खुलासा