हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक; एक व्हिडीओ कॉल अन् क्षणात 13 लाख रुपये गायब
देशभरात ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. चंदिगडमध्ये राहणाऱ्या हवाई दलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल 13 लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सुरिंदर कुमार असे या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. 13 जानेवारीला सुरिंदर कुमार यांना एक कॉल आला. यात त्यांना सांगितले की, तुमचा मोबाईल नंबर 6 तासांसाठी डिसकनेक्ट होईल.
घाबरलेल्या सुरिंदर कुमार यांनी टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क केला, परंतु ज्याला फोन केला त्या अधिकाऱ्याने सांगितले की, तुमचे नाव एका मनी लॉण्डरिंग प्रकरणात आले आहे. यात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा समावेश आहे. या प्रकरणात 56 लाख रुपयांची लाच घेतली असून तुमच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. सुरिंदर यांच्याकडून 13 लाख रुपये उकळल्यानंतर स्कॅमर्स आणखी पैशांची मागणी केली.
व्हॉट्सऍपवरून व्हिडीओ कॉल
स्कॅमर्सने सुरिंदर यांना व्हॉट्सऍपवरून एक व्हिडीओ कॉल केला. यामध्ये एक व्यक्ती पोलीस गणवेशात होता. तो स्वतःला मुंबई पोलीस सांगत होता. त्याने सुरिंदर यांना अटक करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या सुरिंदर यांनी काय करावे लागेल, असे स्कॅमर्सला विचारले. यावर स्कॅमर्सने सुरिंदर यांना 6.5 लाख ट्रान्सफर करायला सांगितले. दोन दिवसांनंतर पुन्हा 6.7 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List