Muffins- आता मफिन्स करा घरच्या घरी! बच्चेकंपनीसाठी घरी मफिन्स बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स

Muffins- आता मफिन्स करा घरच्या घरी! बच्चेकंपनीसाठी घरी मफिन्स बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स

घरी असल्यावर बच्चेकंपनीला सतत काही ना काहीतरी नवीन खायला द्यावं लागतं. अशावेळी घरातील गृहिणीला प्रश्न सतावतो, काय बनवायचं. अनेकदा तर मुलांच्या मागण्या पूर्ण करता करता आईची दमछाक होते. अशावेळी घरातील पदार्थांपासून बेकरी आयटम करण्याकडे गृहिणींचा कल असतो. बेकरी प्रोडक्टस् ही सध्याच्या घडीला मुलांची आवडती आहेत. केक, पेस्ट्री, मफिन्स खाण्याकडे मुलांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशावेळी एखादा पदार्थ पहिल्यांदा करताना, तारांबळ उडते. म्हणूनच आज आपण मफिन्स करताना तुम्हाला काय आणि कोणत्या टिप्सचा वापर करायला हवा हे सांगणार आहोत. 

 

 

रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी या सूप्सचा आहारात समावेश करा

 

मफिन्स बनवण्यासाठी साध्या सोप्या टिप्स

मफिन्स करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे वस्तूंचा वापर मोजून मापून करायला हवा नाहीतर मफिन्स बिघडण्याचा संभव असतो. मैदा, तूप, बटर, साखर, बेकिंग पावडर यांचे अचूक प्रमाण असायला हवे. अन्यथा मफिन्स बिघडण्याची जास्त शक्यता असते.

 

मफिन्ससाठी करण्यात येणारे बॅटर हे अधिक जाड आणि पातळ असता कामा नये. बॅटर करताना कायम योग्य प्रमाणात करायला हवे. अन्यथा बॅटर बिघडल्यास पदार्थ फसण्याची भीती अधिक असते.

 

 

 

 

 

मफिन्सचे बॅटर करताना कायम हलक्या हातांचा वापर करावा. हलक्या हातांचा वापर केल्यामुळे, पदार्थ फुलण्यास मदत होते.

 

कोणतीही गोष्ट करण्याआधी आपल्या घरातील ओव्हनचा वापर कसा करायचा हे नीट शिकून घ्या. मफिन्स करण्यासाठी किमान 180 डिग्रीवर आधी ओव्हन प्री हिट करुन घ्यायला हवा. त्यानंतर बेक करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे ठेवायला हवे.

 

 

मफिन्सचे मोल्ड बाजारात सहजासहजी उपलब्ध असतात. त्यामुळे मोल्ड निवडताना विचार करुन निवडावेत. सिलिकाॅन किंवा पेपर लाइनर्स मोल्ड हे सर्वात उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे याच मोल्डची निवड करावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले…. राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला...
Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर
विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
‘मन सुन्न करणारे फोटो’, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ‘हास्यजत्रा’मधील अभिनेत्याचा संताप
‘छावा’ मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस…, व्हिडीओ पाहून म्हणाल…