इंडियाज गॉट लेटेंट वाद चिघळला; सायबर सेलकडून शोसंबंधीत सर्व सदस्यांवर एफआयआर, तर 42 जणांना समन्स
इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून रणवीरसह समय रैना, त्याचा शो आणि अनेक सदस्य चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा वाद आता जास्तच चिघळताना दिसत आहे. अनेकांना समन्स पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत सायबर सेलने या प्रकरणात 40 जणांना समन्स पाठवले आहेत. काही लोकांचे ईमेल चुकीचे आहेत, त्यामुळे सोशल मीडियाद्वारे अशा लोकांना समन्स पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
तसेच आता महाराष्ट्र सायबर सेलच्या कारवाईनुसार समय रैनाला 18 फेब्रुवारी रोजी सायबर विभागासमोर हजर राहावे लागणार आहे.एवढंच नाही तर हा वाद सुरु झाल्यानंतर तो वाढत असल्याचं लक्षात येताच त्याने यूट्यूबवरून त्याच्या शोचे सर्व एपिसोड डिलीट करू टाकले आहेत.
दरम्यान आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे सायबर सेलने शोसंबंधीत असणाऱ्या 42 जणांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. ज्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे त्यात कलाकार, निर्माते आणि प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे.
एवढंच नाही तर महाराष्ट्र सायबर सेलने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोच्या आतापर्यंतच्या सर्व भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच सायबर सेलने 42 जणांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. ज्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे त्यात कलाकार, निर्माते देखील आहे.
महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘एजन्सीने शोसंबंधित सर्व 42 लोकांना समन्स पाठवले आहेत. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी तपासात शोचे सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत आणि असेही म्हटले आहे की तपास सुरू असेपर्यंत शोचे अकाउंटही बंद करावं. सायबर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्या शोमधील जो वादग्रस्त एपिसोड होता तो काढून टाकला होता मात्र, नंतर समय रैनाला शोशी संबंधित सर्व व्हिडिओ काढून टाकण्यास सांगण्यात आले.
रणवीर, समय ते या शोसंबधी असलेल्या सर्वच सदस्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पुढे जाऊन हे प्रकरण कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List