Chhaava- ‘छावा’च्या गर्जनेनं बाॅलीवुड दणाणलं, आगामी सिनेमांसाठी कठीणकाळ!

Chhaava- ‘छावा’च्या गर्जनेनं बाॅलीवुड दणाणलं, आगामी सिनेमांसाठी कठीणकाळ!

बाॅलीवूडमधील बहुचर्चित सिनेमांना ‘छावा’चा पंजा चांगलाच भारी पडला आहे. छावाने 18 व्या दिवशी 625 कोटींचा आकडा ओलांडत भरघोस कमाईचा उच्चांक गाठला आहे.  सकाळी 6 चा शोसुद्धा हाऊसफुल्ल असल्याने, छावाची छाप प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. सिनेमागृहात टाळ्या, शिट्या आणि शिवगर्जनांनी वातावरण चांगलेच दुमदुमले आहे. सिनेमाचे मनाचा ठाव घेणारे संवाद, विकी कौशलचा अभिनय आणि अंगावर काटा आणणारा शेवट ही अशी भट्टी जमून आल्यामुळेच सिनेमागृहात हाऊसफुल्लचे फलक लागले आहेत. तिकीटबारीवर छप्परफाड कमाई करणारा 2025 मधील ‘छावा’ हा या वर्षीचा पहिलाच सिनेमा आहे.

 

‘छावा’मुळे आगामी सिनेमांसाठी मात्र कठीणकाळ असणार आहे असे भाकीत आता बाॅलीवुडच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. छावा चित्रपटासाठी अनेक थिएटरर्स बुक असल्याने, आगामी सिनेमांना जागा मिळणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच जाॅन अब्राहमचा आगामी सिनेमा ‘द डिप्लोमॅट’ पुढे ढकलण्यात आलेला आहे. आगामी सिनेमांना छावा कडून भीती असल्यामुळे, अनेकांनी सिनेमा पुढे ढकलण्यासाठी आता पाऊल उचलले आहे. आगामी सिनेमांची कथा पटकथा उत्तम असल्यास ते सिनेमा या छावापुढे टिकतील असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. परंतु सध्याची छावाची घोडदौड पाहता मात्र, आगामी सिनेमांसाठी रस्ता सुखकर असणे हे कठीण आहे.

अभिनेता विकी कौशलने साकारलेले संभाजी महाराज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. तर महाराणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना सुद्धा वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा उत्तम अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.  ‘छावा‘ हिंदुस्थानासह परदेशातही उत्तम कमाई करत आहे. 
 
सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत असून, अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका वठवली आहे. यासोबत चित्रपटामध्ये सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये आदी मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘छावा‘ बघून  चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रेक्षक केवळ छावाचेच गुणगान गातोय. हेच आगामी सिनेमांसाठी कठीण बनले आहे.   

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले…. राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला...
Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर
विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
‘मन सुन्न करणारे फोटो’, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ‘हास्यजत्रा’मधील अभिनेत्याचा संताप
‘छावा’ मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस…, व्हिडीओ पाहून म्हणाल…