‘फायटर’ तनिष्का; हिंदुस्थानी लष्करातही महिलांची उत्तुंग भरारी, वायुदलात जग्वार उडवणारी पहिली महिला पायलट
सैन्यदलाचे स्वप्न पाहणाऱ्या तनुष्का सिंहने केवळ आपले स्वप्नच पूर्ण केले नाही, तर अनोखा बहुमानही पटकावला आहे. फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंह वायुदलात जग्वार फायटर जेट उडवणारी पर्मनंट पहिली महिला पायलट बनली आहे. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले आजोबा कॅप्टन डी. बी. सिंह यांच्यापासून प्रेरणा घेत झेप घेत तनुष्काने वायुदलाच्या इतिहासात नवा अध्याय जोडला.
तनुष्काने सुरुवातीपासून सैन्यदलात करीअर करण्याचा विचार केला होता. त्यानंतर तिने वायुदलावर लक्ष केंद्रित केले. हॉक एमके 132 एअरक्राफ्टवर विशेष प्रशिक्षण घेतले. तनुष्का मिलिट्री बॅकग्राऊंडमधली आहे. आजोबांपासून तिने प्रेरणा घेतली. तिच्या आजोबा आणि वडील सशस्त्र दलातून निवृत्त झालेले आहेत. तनुष्काचा जन्म उत्तर प्रदेशातील. वडील निवृत्त लेफ्टनंट कर्नल अजय प्रताप सिंह यांच्यासोबत ती मंगळुरू येथे वास्तव्यास आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List