Banana Leaf- केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यासाठी होतील खूप सारे फायदे! वाचा केळीच्या पानाचा गुणधर्म

Banana Leaf- केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यासाठी होतील खूप सारे फायदे! वाचा केळीच्या पानाचा गुणधर्म

केळीच्या पानावर जेवणाची परंपरा ही आपल्याकडे फार पूर्वापार चालत आलेली आहे. खासकरुन सणा-समारंभाला केळ्याच्या पानांचा थाट आणि त्यावरील पदार्थांचा घमघमाट आपल्याला अनुभवण्यास मिळतो. दक्षिणात्य असो वा महाराष्ट्रीयन असो किंवा संपूर्ण हिंदुस्थानात पारंपारिक संस्कृतीनुसार केळीच्या पानांवर अन्न नियमितपणे खाल्ले जात असे.
केळीच्या पानांवर खाणे हे केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी केळीच्या पानावर जेवणे हे खूपच फायदेशीर आहे. केळीच्या पानातील पोषक घटक अन्नासोबत आपल्या पोटात जातात. त्याचा शरीराला फायदा होतो, तसेच केळीच्या पानावर गरम जेवण दिल्यानंतर त्याचा सुगंधदेखील जेवणात मिसळतो.

केळीच्या पानांवर नियमितपणे खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. केस निरोगी आणि अधिक चमकदार बनतात.

 

केळीचे पान पर्यावरणाला पूरक आहे. त्यामुळे केळीच्या पानांवर खाल्ल्याने पर्यावरणाची हानी होत नाही आणि याचे विघटनही सहज होते.

 

केळीच्या पानात जेवल्यामुळे, त्वचेवर सुरकुत्या येण्यास प्रतिबंध होतो आणि त्वचा तजेलदारही होते.

 

गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्यास पानातील पौष्टीक गुणधर्म हे पदार्थात उतरतात त्यामुळे पदार्थांची चव अधिक वाढते.

बाहेर जाताना प्रवासात असताना, अन्नपदार्थ केळीच्या पानांमध्ये गुंडाळल्यास ते अधिक काळ ताजे राहतात.

 

पोटांचे आरोग्य उत्तम ठेवायचे असल्यास, केळीच्या पानात जेवणे हे केव्हाही हितकारक आहे.

 

केळीचे पान जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे या पानात खाणे हे अतिशय उत्तम आहे.

 

केळीच्या पानामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे पदार्थांच्या चवीत वेगळा आणि चांगला फरक पडतो.

 

केळीचं पान हे निसर्गामध्ये सहजपणे विघटन होत असल्यामुळे, निसर्गाच्या दृष्टीनेही केळीच्या पानांचा वापर करणे हितावह आहे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आली आहे, असं...
विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, वाल्मिक कराडने कुणाला केला पहिला फोन; सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप
MP Sanjay Raut News : ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल
शक्ती कपूरवर आली मुंबईतील घर विकण्याची वेळ, काय आहे नेमकं कारण?
‘तारक मेहता..’मधील अय्यर खऱ्या आयुष्यात आजही सिंगल; लग्नाबद्दल म्हणाला..
31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ! अक्षयने स्पर्श करताच जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
“गर्भपात नाही केला तर..”; वन नाईट स्टँडनंतर प्रेग्नंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खुलासा