बँक निफ्टीचा सावरण्याचा प्रयत्न; सेन्सेक्स, निफ्टीत घसरणीचा सिलसिला सुरूच
हिंदुस्थानी शेअर बाजार सध्या प्रचंड दबावात आहे. मात्र, सोमवारी बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातील असलेली थोडी तेजी अखेपर्यंत कायम राहिली नाही. मात्र, मंगळवारी बँक निफ्टीने बाजार सावरण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे. बण निफ्टीमध्ये आज आलेल्या तेजीमध्ये देशातील सर्वात मोठी स्रावजनिक बँक असलेल्या एसबीआयचा मोठा सहभाग होता. त्यामुळे बँकनिफ्टी आज 130 अंकांच्या वाढीसह 48,245.20 अंकांवर बंद झाला. मात्र, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकांत घसरणीचा सिलसिला सुरुच आहे.
शेअर बाजार मंगळवारी पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.13 म्हणजेच 96.01 अंकांनी घसरून 72,989.93 वर बंद झाला. तर निफ्टी 36.65 अंकांनी म्हणजेच0.17 टक्क्यांनी घसरून 22,082.65 वर बंद झाला. सेन्सेक्सचा दिवसभराचा उच्चांक 73,033.18 अंकांवर होता. तर निफ्टीचा दिवसभराचा उच्चांक 22,105.05 अंक होता.
बँक निफ्टीमध्ये एसबीआयचे शेअर्स आज सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर झोमॅटोच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सच्या किमतीतही वाढ झाली आहे. निफ्टीच्या आकडेवारीनुसार 13 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले. तर 486 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. तसेच आज 184 कंपन्यांचे शेअर्स लोअर सर्किटवर आहेत. तर फक्त 95 कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटवर बंद झाले.
सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँक निफ्टी वगळता बाजार लाल रंगातच बंद झाला. मिडकॅप निर्देशांकही एकाच पातळीवर होता. स्मॉलकॅप इंडेक्समध्ये काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली. पीएसई, ऊर्जा, तेल आणि वायू समभागांमध्ये काही प्रमाणमात खरेदी झाली आहे. निफ्टी बँक निर्देशांक वाढीने बंद झाला. तर ऑटो, आयटी, एफएमसीजी शेअर्समध्ये दबाव दिसून आला. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने 9 महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. अवघ्या 3 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 1.33 लाख कोटी बुडाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List