Dhananjay Munde Resignation : नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा झाला तर महायुतीत एकही मंत्री राहणार नाही – एकनाथ खडसे

Dhananjay Munde Resignation : नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा झाला तर महायुतीत एकही मंत्री राहणार नाही –  एकनाथ खडसे

नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा झाला तर महायुतीत एकही मंत्री राहणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून यावर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे म्हणाले की, ”धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे. गेले तीन महिने सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. यातच आज त्यांनी राजीनामा दिला आहे. मला वाटतं त्यांनी याआधीच राजीनामा दिला पाहिजे होता. संतोष देशमुख यांच्या हत्याचे निर्घृण फोटो समोर आले आहेत. अशा निर्घृण हत्या करणाऱ्यांना कोणाची साथ असेल, तसे निष्पन्न होत असेल, तर हे दुर्दैवी आहे. याप्रकरणी आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.”

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, ”नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्या बाबतीत घडलं होतं. वास्तविक पाहता माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. मी ती जमीन घेतली नव्हती. मी फक्त एक साधी मीटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून मला नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लागला. असाच जर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर, या मंत्रिमंडळात एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा तर, यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे (महायुती सरकारमधील मंत्र्यांकडे) शिल्लकच राहिली नाही, म्हणून इतके दिवस आपल्याला वाट पाहावी लागली.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अबू आझमींकडून औरंगजेबचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी समोर, थेट बंदूक काढत धमकवले अबू आझमींकडून औरंगजेबचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी समोर, थेट बंदूक काढत धमकवले
Samajwadi Party leader Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी
वडील कर्नाटकचे डीजी, स्वत: अभिनेत्री; तरीही केली 15 किलो सोन्याची तस्करीत
नॉनवेज खाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय…; रुबिना दिलैकने फराह खानला चिकन सोडण्याचा सल्ला का दिला?
अंकिता लोखंडेचं स्वयंपाकघरही इतकं लॅवीश; 2 एसी अन्… बरंच काही; फराह खानही अवाक्
शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस
फक्त चिमूटभर हिंग आहे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा! वाचा हिंगाचे महत्त्व