Monalisa: कुंभमेळ्यातील मोनालिसा चुकीच्या हाती, निर्माता तरुणींना मुंबईत बोलावतो आणि…; गंभीर आरोप काय?
महाकुंभ मेळ्यात फुटपाथवर बसून रुद्राक्ष आणि फुले विकणारी सुंदर तरुणी मोनालिसा भोसले रातोरात स्टार झाली आहे. आज ती एक स्टार म्हणून ओळखली जात आहे. मोनालिसाचे सुंदर डोळे आणि निखळ सौंदर्य पाहून अनेकजण तिच्यावर फिदा झाले आहेत. मोनालिसाची लोकप्रियता पाहून तिला एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने चित्रपटाची ऑफर दिली आहे. ती दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्या ‘द डायरी ऑफ मणिपुर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, निर्माते जितेंद्र नारायण यांनी सनोज यांच्यावर मोनालिसाला फसवल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडियावर सध्या मोनालिसाचे अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. काही व्हिडीओंमध्ये मोनालिसा अभिनयाचे धडे घेताना दिसत आहे. दरम्यान, सनोज यांच्यावर मोनालिसाला फसवल्याचा आरोप केला आहे. निर्माते जितेंद्र नारायण यांनी सनोज यांच्यावर हे आरोप केले आहेत.
काय म्हणाले जितेंद्र?
जितेंद्र नारायण सिंह उर्फ वसीम रिजवी यांनी टॉप सीक्रेटला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सनोज यांच्यावर एका गरीब कुटुंबातून आलेल्या मुलीचा फायदा घेतल्याचे सांगितले आहे. तसेच सनोज हे साध्याभोळ्या मुलींना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्यासोबत गैरव्यवहार करतात असे जितेंद्र यांनी म्हटले. त्यांनी सनोज यांच्यासोबत काम करण्याचा अतिशय वाईट अनुभव असल्याचे सांगितले. सनोज आणि जितेंद्र यांनी एकत्र तीन सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच सनोज हे फसवणुक करत असल्याचा दावा देखील जितेंद्र यांनी केला आहे.
‘मला मोनालिसा आणि तिच्या कुटुंबियांसाठी फार वाईट वाटत आहे. ते खूप सरळ आणि साधे लोक आहेत. पण सनोज मिश्रा सारखे लोक तुमच्या दारात उभे आहेत आणि कोणतीही विचारपूस न करता त्यांनी त्यांच्या मुलीला सनोज यांच्या हवाले केले आहे’ असे जितेंद्र म्हणाले. तसेच या मुलाखतीमध्ये जितेंद्र यांनी सांगितले की सनोज यांच्यासोबत सध्या कोणीही काम करण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपटासाठी देखील पैसे नाहीत.
पहिल्याच सिनेमासाठी मोनालिसाला किती पैसे मिळाले?
जितेंद्र आणि सनोज यांच्यामध्ये वाद सुरू असताना मोनालिसाला पहिल्याच सिनेमासाठी किती पैसे मिळाले याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. मोनालिसाला पहिल्या सिनेमासाठी २१ लाख रुपये मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामधील १ लाख रुपये अडवान्स देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List