Weight Loss- वजन कमी करण्यासाठी डाएट करु नका! ओवा आणि जिरे खा वजन होईल झटकन कमी
लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर समस्या अधिकच बिकट होते. मात्र, वजन कमी करणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. काही लोक यासाठी जिममध्ये प्रचंड घाम गाळतात, तर काही थेट डॉक्टरांकडे जातात. डाॅक्टरकडे गेल्यानंतर दिलेले डाएट आपण काही काळ पाळतो. पण नंतर मात्र डाएटही करायला कंटाळा येतो. या सगळ्या व्यतिरिक्त, आम्ही तुम्हाला अशा पेयाबद्दल सांगत आहोत, जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. जिरे आणि ओवा दोन्हीमुळे आपण वजन आरामात आटोक्यात आणू शकतो.
लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, युरिक ऐसिड आणि मधुमेह यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो. जिरे वजन कमी करण्यासाठी कसे उपयुक्त आहेत हे आपण बघुया.
जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बायोटिक घटक असतात, जे शरीरातून जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात आढळणारे घटक कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करतात, यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
जिऱ्यात लोह, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस असतात यामुळे एकूण आरोग्यासाठी हे घटक सर्वाधिक उपयुक्त आहेत.
ओव्यामुळे आपले चयापचय मजबूत होते. ओवा आणि जिरे रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी उठून हे पाणी सर्वात आधी प्यावे.
ओवा आणि जिरे यांची पाणी कोमट पाणी करूनही आपण पिऊ शकतो. पण हे पाणी पिण्याआधी काहीही खाऊ नका. रिकाम्या पोटी हे पाणी पिणे अधिक उत्तम. किमान आठवडाभर हे असे करून बघा, नक्कीच तुमचे वजन जलद गतीने कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List