फक्त चिमूटभर हिंग आहे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा! वाचा हिंगाचे महत्त्व

फक्त चिमूटभर हिंग आहे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा! वाचा हिंगाचे महत्त्व

हिंदुस्थानातील स्वयंपाकघरात सर्व प्रकारचे मसाले आहेत, ज्यांचे काम केवळ जेवणाची चव वाढवणे नाही तर त्यांनी स्वतःमध्ये काही जादुई गुणधर्म देखील लपवले आहेत. आपल्याकडे असणारे गरम मसाले हे केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहेत. चिमूटभर हिंग हा केवळ अन्नपदार्थांची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदे मिळतात. प्रत्येक स्वयंपाकघरात छोट्या डब्यात मिळणाऱ्या हिंगामध्ये अनेक फायदे दडलेले आहेत.

 

 

हिंग भाजी किंवा डाळीमध्ये घातल्यास चव वाढते आणि औषधाप्रमाणे अंगावर लावल्यास वेदना दूर होतात. हिंग खाण्यात जितके फायदेशीर आहे तितकेच ते लावल्याने फायदेही होतात.

 

तुम्हाला पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर हिंगाचा वापर फक्त जेवणातच नाही तर इतरही अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही हिंगाच्या गुणधर्माचा उपयोग करू शकता. एक ग्लास पाणी थोडे गरम करा. या कोमट पाण्यात हिंग टाकून विरघळवून प्या. जर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकत नसाल तर हिंग बारीक करून त्याची पेस्ट वापरा. ही पेस्ट नाभीभोवती वर्तुळात लावावी. त्यामुळे पोटात गॅस झाल्यास फायदा होईल आणि पचनक्रियाही सुधारेल.

 

पोटाशी संबंधित समस्यांसाठी हिंग आवश्यक मानली जात होती. डोकेदुखी दूर करण्यासाठीही ही हिंग गुणकारी आहे. अनेकदा लोक डोकेदुखीमध्ये कोणत्याही प्रकारची गोळी न घेण्याचा प्रयत्न करतात. यासाठी हिंगाची पेस्ट तयार करून ठेवावी. ही पेस्ट हलक्या हाताने कपाळावर लावा. थोड्या वेळाने ही प्रक्रिया पुन्हा करत रहा. डोकेदुखीत आराम मिळेल. 

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे...
फरहानची गोव्यात दंबगगिरी, आता ‘वॉन्टेंड गर्ल’ आयशा टाकियाची वादात उडी, थेट असे केले आरोप
पाकिस्तानी लष्करी कम्पाउंडमध्ये आत्मघातकी हल्ला; स्फोटकांच्या गाड्यांचा घडवला अपघात, 6 जणांचा मृत्यू
Champions Trophy 2025- टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; कांगारुंचा 4 गडी राखत पराभव
Hybrid इंजिन, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा फीचर्स; Volvo XC90 लॉन्च, जाणून घ्या किंमत
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत निकाल लावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा
रिफायनरीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मिंधे गटात संघर्ष होणार; विषय संपला म्हणणारा मिंधे गट तोंडावर आपटला