­मुंबईच्या डबेवाल्यांचे ’टायमिंग’ कोलमडले! रस्त्यांवर जागोजागी खोदकाम, एसी लोकलच्या फेऱ्यांचा फटका

­मुंबईच्या डबेवाल्यांचे ’टायमिंग’ कोलमडले! रस्त्यांवर जागोजागी खोदकाम, एसी लोकलच्या फेऱ्यांचा फटका

>> मंगेश मोरे

मॅनेजमेंट गुरू म्हणून देश-विदेशात ख्याती मिळवलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘टायमिंग’ सध्या कोलमडले आहे. शहरातील रस्त्यांवर जागोजागी सुरू असलेले खोदकाम तसेच लोकलमधून डब्यांची वाहतूक करताना एसी लोकलचा आलेला अडसर याचा मोठा फटका डबेवाल्यांच्या सेवेला बसला आहे. नोकरदारांच्या टेबलावर डबा पोहोचवण्यास साधारण तास ते दीड तासाचा विलंब होत असल्याने डबेवाल्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांच्या सेवेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पिढय़ान्पिढय़ा व्यवसाय जपताना वक्तशीरपणाचे व्रत डबेवाल्यांनी काटेकोरपणे जोपासले आहे. कोरोना महामारीनंतर व्यवसायावर परिणाम झाला. मात्र मुंबईकरांना वेळेत डबे पोहोचवण्याचे समीकरण डबेवाल्यांनी विस्कळीत होऊ दिले नव्हते. अलीकडच्या काळात उपनगरी रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या वाढलेल्या फेऱ्या तसेच मुंबईतील रस्त्यांवर खोदकामामुळे वाहतूककोंडी होत असल्याने त्याचा परिणाम डबेवाल्यांच्या वक्तशीरपणावर झाला आहे. पश्चिम रेल्वेवर 109 तर मध्य रेल्वेवर 66 एसी लोकल धावत आहेत. या लोकलमध्ये ‘सामान कक्ष’ नाही. तसेच तिकीट परवडत नसल्याने एसी लोकलमधून डब्यांची वाहतूक करणे डबेवाल्यांना परवडणारे नाही. एसी लोकलमुळे साध्या लोकलचे वेळापत्रक बदलले आहे. त्याचा जेवणाचे डबे पोहोचवण्याच्या सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे डबेवाले सांगतात. एसी लोकल आणि रस्त्यांवरच्या खोदकामामुळे नोकरदारांना ‘लंच ब्रेक’मध्ये डबे पोहोचवणे मुश्कील झाल्याची खंत डबेवाले व्यक्त करताहेत.

डबेवाल्यांची संख्या निम्म्यावर

काही वर्षांपूर्वी डबेवाल्यांना दरमहा 20 ते 22 हजार रुपये उत्पन्न मिळायचे. आता फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे. वक्तशीरपणाचे गणित बिघडल्याने ग्राहकांची संख्या दोन लाखांवरून 90 हजारांपर्यंत कमी झाली तर डबेवाल्यांची संख्या पाच हजारांवरून दोन हजारांपर्यंत कमी झाली आहे.

इलेक्ट्रिक बाइक्स मिळण्याची प्रतीक्षाच

डबेवाल्यांना इलेक्ट्रिक बाइक्स देण्यासाठी सरकार तसेच काही कंपन्यांकडून आश्वासन दिले गेले होते. मात्र त्या आश्वासनाची गाडी पुढे सरकली नाही. त्यामुळे डबेवाल्यांना भर उन्हा-पावसातून सायकलवरूनच डबे घेऊन नोकरदारांच्या कार्यालयांपर्यंत धाव घ्यावी लागत आहे. यात वयस्कर डबेवाल्यांची दमछाक होत आहे.

मुंबईतील रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच यापूर्वी प्रत्येक लोकलमधून होणाऱ्या डब्यांच्या वाहतुकीमध्ये अलीकडे वाढलेल्या एसी लोकलचा अडसर आला आहे.

  • विष्णू काळडोके, प्रवत्ते, मुंबईचा डबेवाला
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवाची काठी लागत नाही, न्याय मात्र मिळतो, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया, त्या खंडणी प्रकरणाविषयी मोठी मागणी देवाची काठी लागत नाही, न्याय मात्र मिळतो, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया, त्या खंडणी प्रकरणाविषयी मोठी मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो आणि व्हिडिओ समोर आली आहेत. त्यानंतर राज्यात लोकांच्या संतापाचा उद्रेक दिसत आहे....
Aditya thackrey : सरकार बरखास्त केलं पाहिजे – आदित्य ठाकरे आक्रमक
या घडीची सर्वात मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा, ‘पीए’ सागर बंगल्यावर
आर. माधवन तरुणींसोबत फ्लर्ट करतो? ‘तो’ स्क्रीनशॉट व्हायरल होताच म्हणाला…
‘छावा’नंतर संतोष जुवेकरची फॅनफॉलोइंग अन् क्रेझ वाढली, गोव्याच्या स्टारबक्समध्ये मिळालं खास सरप्राइज
‘ही ओव्हरस्मार्ट पिढी..’; समय रैनाला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं
रमजान सुरु होतात विकी कौशलचं मोठं वक्तव्य चर्चेत, ‘छावा सिनेमाच्या सेटवर रोझा…’