Sania Mirza : सानिया मिर्झाच्या लेकाची बॉलिवूडमध्ये एंट्री? साईनिंग अमाऊंटही मिळाली…
माजी टेनिसपटू सानिया मिर्झा केवळ तिच्या खेळामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिचे नाव क्रिकेटपटू मोहम्मद शमीशी जोडले गेले, परंतु तिच्या वडिलांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला. सध्या सानिया मिर्झा आपल्या मुलाला एकटीने वाढवत आहे. सानिया मिर्झाचे बॉलीवूड लोकांशी चांगलं नातं आहेत हे बहुतेकांना माहीत आहे. तिची बेस्ट फ्रेंड दुसरी कोणी नसून करोडपती दिग्दर्शक फराह खान आहे. एवढंच नव्हे शाहरुख खानची मैत्रीण आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर- दिग्दर्शक असलेल्या फराह खानने सानिया मिर्झाचा मुलगा इझानला लॉन्च करण्याचे आश्वासन दिले आहे.
खरंतर , चित्रपट दिग्दर्शित करणारी फराह खान सध्या ‘सेलिब्रेटी मास्टर शेफ’ देखील जज करत आहे. यूट्यूबवर तिचे स्वतःचे कुकिंग चॅनलही आहे. फराह खानच्या चॅनलला 13.1 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे. आत्तापर्यंत तिने तिच्या चॅनलवर 147 व्हिडिओ अपलोड केले आहेत. सानिया मिर्झा नुकतीच फराहच्या घरी पोहोचली होती.
सानियाच्या मुलाला फराह खान लाँच करणार?
सानिया मिर्झाने फराह खानच्या चॅनलसाठी कुकिंगही केलं. तर त्याचवेळी फराहने तिच्यासाठी तिची आवडती चिकन 65 बनवली. यादरम्यान गप्पा मारताना फराह खान सानियाच्या मुलाला म्हणाली – मी तुला लॉन्च करेन, तू माझा हिरो आहेस. तिचं हे वाक्य ऐकल्यावर सानियानेही एक मजेशीर आठवण सांगितली. जेव्हा फराह ही पहिल्यांदा तिच्या मुलाला भेटली होती , तेव्हा तिने त्याला 10 रुपयांची नोट दिली होती. तेव्हही फराह म्हणाली होती की मी याला लाँच करेन, अशी आठवण सानियाने सांगितली.
ती तर फक्त साईनिंग अमाऊंट होती, असं म्हणत फराहनेसुद्धा जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा संपूर्ण किस्सा त्या मजे-मजेत ऐकवत होत्या. भविष्यात खरोखरच फराह ही तिच्या मैत्रिणीच्या मुलाला लाँच करूही शकते, पण ते खरंच कधी होईल हे सांगता येत नाही. तिला तिच्या मुलाला चित्रपटात पाठवायचे आहे की नाही याबद्दल साकाहीनिया मिर्झानेही सांगितले नाही. पण या शोमध्ये तिने फक्त एक जुनी गोष्ट शेअर केली. यावेळी सानिया मिर्झासोबत तिची बहीण अनम मिर्झाही उपस्थित होती.
सानिया -फराहची मैत्री
फराह खान आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झा खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. एवढेच नाही तर त्या दोघी कपिल शर्माच्या शोमध्येही एकत्र गेल्या होत्या. आणि आता तर त्या दोघी एकत्र कुकिंग करताना दिसल्या. फराहचा हा एपिसोड 21 तासांत 11 लाख लोकांनी पाहिलाय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List