…अन्यथा आम्हीच केईएमसमोरील इंग्रजी फलक उखडून टाकू! शिवसेनेचा केईएमच्या प्रशासनाला गंभीर इशारा
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व प्रवेशद्वारांवरील मजकूर इंग्रजी भाषेत ठेवून राज्य सरकार आणि पालिकेने मराठी भाषेचा अवमान केला आहे. केईएमसमोरील इंग्रजी फलक तत्काळ हटवा अन्यथा आम्हीच हे फलक उखडून टाकू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने आज केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाला देण्यात आला आहे.
शताब्दी वर्षानिमित्त केईएम रुग्णालयासमोर तयार करण्यात आलेल्या सर्व प्रवेशद्वारांवरील मजकूर इंग्रजी भाषेत ठेवून राज्य सरकार आणि पालिकेने मराठीचा अवमान केला आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळूनही तिची व्यवहारात होत असलेली अवहेलना राज्य सरकारला रोखता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने आज केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाची भेट घेण्यात आली. तातडीने इंग्रजी प्रवेशद्वार हटवले नाहीत तर शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून सदर प्रवेशद्वार उखडून टाकेल, असा इशारा देण्यात आला. शिवसेनेच्यावतीने यासंदर्भातील निवेदन केईएमच्या प्रशासनाचे प्रमुख डॉ. पाठक आणि डॉ. मोहन देसाई यांना देण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख किरण तावडे, जयसिंग भोसले, मिनार नाटळकर आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List