लघुवाद न्यायालयातून पुरावे गहाळ, हायकोर्टाने दिले कारवाई करण्याचे आदेश
मुंबईतील लघुवाद न्यायालयातून पुराव्याचे फोटो गहाळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
न्या. माधव जामदार यांच्या एकल पीठाने हे आदेश दिले. लघुवाद न्यायालयातून पह्टो गहाळ होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. लघुवाद न्यायालयाच्या प्रधान न्ययाधीशांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
काय आहे प्रकरण
मुंबईतील एका मालमत्तेचा वाद लघुवाद न्यायालयात सुरू आहे. यासाठी कोर्ट कमिशनरने या मालमत्तेचे काही पह्टो काढले होते. हे फोटो कोर्टातून गहाळ झाले. त्याची प्रत अर्जदार व प्रतिवादी यांच्याकडे होती. पुराव्यांसाठी हे फोटो पुन्हा जोडण्यात यावेत, अशी विनंती लघुवाद न्यायालयात करण्यात आली. लघुवाद न्यायालयाने ही मागणी फेटाळली. कोर्ट कमिशनरचे निधन झाले आहे. हे पह्टो पुराव्यात जोडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले होते.
कोर्टाची कबुली
हे प्रकरण सुनावणीसाठी एका कोर्ट रूममधून दुसऱया कोर्ट रूममध्ये वर्ग करण्यात आले. त्यावेळी या फोटोसह सर्व कागदपत्रे होती. नंतर या कागदपत्रातून फोटो गहाळ झाले, अशी कबुली लघुवाद न्यायालय प्रशासनाकडून न्या. जामदार यांच्यासमोर देण्यात आली.
फोटो जोडण्याचे आदेश
पुराव्याला फोटो जोडण्यास अर्जदार व प्रतिवादीने संमती दिली आहे. हे 23 फोटो पुराव्यांना जोडण्यात यावेत, असे आदेश देऊन न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List