Hair Care- केसांना नवसंजीवनी देण्यासाठी पेरुच्या पानांचा उपयोग अशाप्रकारे करा, वाचा पेरुची पाने का आहेत उपयोगी

Hair Care- केसांना नवसंजीवनी देण्यासाठी पेरुच्या पानांचा उपयोग अशाप्रकारे करा, वाचा पेरुची पाने का आहेत उपयोगी

लांब, काळेभोर, जाड केस हवे असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. केसांची चांगली काळजी घेताना आपण काय करावे हे खूप महत्त्वाचे आहे. पेरू केवळ खाण्यासाठीच नाही तर, पेरुंच्या पानांचा उपयोग करुन आपण आपल्या केसांनाही नवसंजीवनी देऊ शकतो. पेरु खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे आपल्याला माहीत आहेच. पण केवळ इतकेच नाही तर, पेरुच्या पानांमुळे केसांनाही नवसंजीवनी प्राप्त होऊ शकते.

 

 

आपण केसांसाठी पेरूची पाने अनेक प्रकारे वापरू शकतो. केसांसाठी पेरूची पाने कशी वापरायची ते जाणून घेऊया.

पेरूची काही पाने घ्या, ती नीट धुवून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. त्यांना ब्लेंडरमध्ये घालून, थोडे पाणी घाला. जाड पेस्ट तयार होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. ही पेस्ट तुमच्या काही मिनिटांसाठी हलक्या हाताने सर्व केसांवर लावून मसाज करा. 30-40 मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा. केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून दोनदा पेरूच्या पानांची पेस्ट वापरायला हवी.

 

मूठभर पेरूची पाने घ्या आणि ती धुवा.  एक लिटर पाण्यात घालून, पाणी उकळू द्या आणि 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवून थंड होऊ द्या. पाणी गाळून एका नंतर या पाण्याने केस धुवावे.  आता फिल्टर केलेले पाणी तुमच्या केसांवर मुळापासून केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत लावावे.  केसांवर हे पाणी लावून काही काळ तसेच सोडावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावे.

 

नारळाचे तेल, कांद्याचा रस आणि पेरूची पाने केसांवर लावणे सर्वात बेस्ट. सर्वप्रथम, मूठभर पेरूची पाने व्यवस्थित धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. या पानांची जाड पेस्ट तयार होईपर्यंत पाने वाटू घ्यावी.

 

मध्यम आकाराचा कांदा घेऊन, त्याचे लहान तुकडे करावेत. त्यानंतर थोड्यावेळाने कांद्याचा रस काढावा. आता कांद्याच्या रसात पेरूच्या पानांची पेस्ट आणि खोबरेल तेल मिसळावे. सर्व मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण केसांवर लावावे. किमान 30 मिनिटे तसेच ठेवावे. यानंतर सौम्य शाम्पूने धुवा.

 

निस्तेज केसांसाठी महिन्यातून एकदा या हेअर पॅकचा वापर करा, केस होतील मजबूत आणि घनदाट

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आली आहे, असं...
विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, वाल्मिक कराडने कुणाला केला पहिला फोन; सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप
MP Sanjay Raut News : ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल
शक्ती कपूरवर आली मुंबईतील घर विकण्याची वेळ, काय आहे नेमकं कारण?
‘तारक मेहता..’मधील अय्यर खऱ्या आयुष्यात आजही सिंगल; लग्नाबद्दल म्हणाला..
31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ! अक्षयने स्पर्श करताच जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
“गर्भपात नाही केला तर..”; वन नाईट स्टँडनंतर प्रेग्नंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खुलासा