राशाचा गोविंदाच्या मुलासोबत ‘अंखियों से गोली मारे’ गाण्यावर जबरदस्त डान्स, राशा आईसारखीच भन्नाट नाचली
90 च्या दशकातील सेलिब्रिटी त्यांची गाणी तसेच डान्सच्या स्टेप्स आजही तेवढ्याच प्रसिद्ध आहे. सेलिब्रिटी किड्सही या जुन्या गाण्यांच्या प्रेमाच असलेलं पाहायला मिळतं. 90 ची गोविंदा आणि रवीनाची जोडी म्हणजे आजही लोकप्रिय आहे. त्यांचे चित्रपट आणि गाणी अजूनही लोकांच्या हृदयात आणि मनात आहेत. दोघेही खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत सोबतच त्यांची मुले यशवर्धन आहुजा आणि राशा थडानी देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
राशा थडानी आणि यशवर्धन यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत
दरम्यान राशा थडानी आणि यशवर्धन यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेही गोविंदा-रवीनाच्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहेत. राशा थडानीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने गोविंदाचा मुलगा आणि तिचा चांगला मित्र असलेल्या यशवर्धन आहुजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यशवर्धनने 28वां वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. तसेच राशाने यशसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. हा सेल्फी शेअर करताना तिने ‘हॅपी बर्थडे यशवर्धन’ असं लिहिले आहे. त्यानंतर तिने त्यांचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.
राशा थडानी तिच्या आई रवीनासारखीच नाचली.
व्हिडिओमध्ये राशा थडानी आणि यशवर्धन पार्टीत नाचताना दिसत आहेत. दोघेही गोविंदा आणि रवीनाच्या ‘अंखियों से गोली मारे’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. राशा तिची आई रवीना टंडन सारखीच जबरदस्त डान्स करताना दिसली. त्यांचा हा डान्स नेटकऱ्यांनाही फार आवडला आहे.
व्हिडिओमध्ये यशवर्धन आहुजा हुडी घातलेला दिसतोय, तर राशा शर्ट आणि पँटमध्ये आहे. दोघांच्याही डान्समुळे नेटकऱ्यांना गोविंदा आणि रवीना टंडनची आठवण झाली. राशाने ‘आझाद’ या पीरियड ड्रामामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिच्यासोबत अमन देवगणनेही याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
दरम्यान गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटांच्या चर्चा सुरु असून खरंच ते दोघेही घटस्फोट घेणार आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच नुकत्याच झालेल्या यशवर्धनच्या बर्थडे पार्टीमुळे नक्की त्यांच्या घराताली वातावरण खरंच तेवढं गंभीर आहे का? असा प्रश्नही नक्कीच पडतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List