मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देणार
नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नवी दिल्लीत 21, 22, 23 फेब्रवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाला देश आणि विदेशातील मराठीजन उपस्थिती लावणार आहेत. मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन देण्याची मागणी आयोजकांनी केली होती. पण मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याबाबतच निर्णय होत नव्हता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘एक्स’च्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List