टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण; पोलिसांची सहा ठिकाणी झाडाझडती, गुह्याची व्याप्ती मोठी, नवीन बाबींचा उलगडा

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण; पोलिसांची सहा ठिकाणी झाडाझडती, गुह्याची व्याप्ती मोठी, नवीन बाबींचा उलगडा

टोरेसच्या नावाने आठवडय़ाला पैसे देण्याचे आमिष दाखवत हजारो नागरिकांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. पोलीस तपासात नवनवीन बाबींचा उलगडा होत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज सहा ठिकाणी धडक देऊन झाडाझडती घेतली. या कारवाईत नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीची महत्त्वाची कागदपत्रे, रोकड, खडे हाती लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र पसार झालेल्या दोन आरोपींचा अद्याप शोध लागू शकलेला नाही.

खडय़ामध्ये पैसे गुंतवा आणि आठवडय़ाला मोठा परतावा कमवा, अशी बतावणी करत टोरेस ज्वेलरीच्या नावाने प्लॅटिनम हर्न प्रा.लि. कंपनी व कंपनीच्या पदाधिकाऱयांनी मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिकांची कोटय़वधीची फसवणूक केल्याचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. या आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी सचिन सुर्वे, तानिया कासातोव्हा आणि व्हॅलेटिंना कुमार अशा तिघांना बेडय़ा ठोकल्या आहेत. तर त्यांचे अन्य दोन साथीदार व्हिक्टोरिया आणि तौफीक हे पसार होण्यात यशस्वी ठरले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने आता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी दोघा आरोपींच्या राहत्या घरासह गिरगाव, ऑपेरा हाऊस, दादर येथील कार्यालयात धडक देऊन झाडाझडती घेतली. या कारवाईत गुंतवणुकीसंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे, रोकड आणि गुंतवणूकदारांना दाखविण्यात आलेले खडे जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.

आतापर्यंतच्या तपासात आम्ही तिघा जणांना अटक केली आहे. मोठय़ा प्रमाणात रोकड, खडे, दस्ताऐवज, गुंतवणुकीची माहिती आम्ही हस्तगत केली आहे. प्रत्येक बाबींची सखोल चौकशी केली जाईल. गुह्याची व्याप्ती मोठी असल्याने आमचा तपास त्यादृष्टीने सुरू आहे. कुठलीही बाब सोडली जाणार नाही. – संग्रामसिंह निशाणदार, उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा)

पोलिसांचा विशेष सेल

मुंबईतील ज्या गुंतवणूकदारांची टोरेसमध्ये आर्थिक फसवणूक झाली आहे अशांसाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एक सेल उघडण्यात आला आहे. तेथे जाऊन गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने असलेली माहिती एमपीआयडीच्या फॉर्ममध्ये भरून देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आणखी पाच कोटींचा घपला

प्रदीपकुमार वैश्य व त्याच्या ओळखीच्यांची 13 कोटी 48 लाख 15 हजार इतकी आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक फसवणुकीचा हा आकडा वाढू लागला आहे. सोमवारपासून समोर येऊन माहिती देणाऱया गुंतवणूकदारांच्या माहितीवरून आणखी पाच कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

आकर्षक हॅण्ड बॅग, गिफ्ट हॅम्पर्स

टोरेसच्या कार्यालयांची झाडाझडती घेतली असता तेथे पोलिसांच्या हाती काही दस्ताऐवज लागले आहेत. शिवाय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी देण्यात आलेल्या हाय हॅण्ड बॅग, खडय़ाचे प्रमाणपत्र, गिफ्ट हॅम्पर्स, माहितीचे पॅम्ल्पेट्स मिळाले आहेत. खडय़ाच्या प्रमाणपत्रात कुठल्याही प्रकारे वजन, माहिती, कॅरेटेज असे काहीच नमूद नाही. अशा प्रकारचे हजारो प्रमाणपत्र बनविण्यात आले होते.

असा होता स्किमचा स्पॅम

टोरेस नावाने कंपनी खोलून पॉन्झी आणि मल्टीलेव्हल मार्पेटिंग स्किम एकत्र करून एक स्किम बनविण्यात आली होती. या स्किममध्ये खडे देण्यात यायचे. ते खडे घेतल्यानंतर प्रत्येक आठवडय़ाला काही टक्क्याने पैसे मिळतील आणि या स्किमची व्याप्ती वाढवत गुंतवणूकदारांची मोठी साखळी बनविणाऱयांना आणखी चांगल्या टक्क्यांनी रोकड मिळेल असे सांगण्यात आले होते.

गाडी, फ्लॅटचे आमिष

नवनवीन गुंतणूकदार आणून कंपनीत गुंतवणूक करणाऱयांची साखळी वाढवेल अशांना आणखी जास्त टक्क्यांनी पैसे मिळतील. तसेच गाडी, महागडे मोबाईल, प्लॅट देण्याचे आमिष दाखवले जायचे. सुरुवातीला काहींना असे देण्यात आले होते, असे काही गुंतवणूकदारांकडून सांगण्यात येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचा पंचनामा करताच महाविकास आघाडीत वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने...
कॅलिफोर्नियातील भीषण वणव्यात सेलिब्रिटींची आलिशान घरं जळून खाक; काहींवर घर सोडण्याची वेळ
‘उदे गं अंबे’ मालिकेत नवा अध्याय; रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा
19 दिवसांपासून अन्न-पाणी नाही..; आणखी बिघडली ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्याची प्रकृती
वयाच्या 51 व्या वर्षी फरहान अख्तर तिसऱ्यांदा बनणार बाबा? शिवानी दांडेकर गरोदर?
व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार पीएमपी बसचे तिकीट, ऑनलाइन तिकिटाला प्रवाशांचा प्रतिसाद
सराईत गुन्हेगार गजा मारणेची गुन्हे शाखेकडून झाडाझडती, पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अ‍ॅक्टिव्ह