चांदिवलीत बांधकामांवर कारवाई; ‘मिसिंग लिंक’ जोडणीचा मार्ग मोकळा
मुंबई महानगरपालिकेने चांदिवली येथील 60 फुटी विजय फायर मार्ग व जंगलेश्वर मंदिर मार्ग (खैरानी रस्ता) यामधील ‘मिसिंग लिंक’ जोडणी प्रकल्पात अडथळा ठरणारी बांधकामे पालिकेने हटवल्याने आता मिसिंग लिंक जोडणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्ता जोडणी (मिसिंग लिंक) प्रकल्पामध्ये आनंदीबाई सुर्वे उद्यानाजवळ पाच बांधकामांचा अडथळा होता. या बांधकामांना ‘एल’ विभागाकडून नोटीस देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यानंतर आज ही बांधकामे हटवण्यात आली. त्यामुळे रस्ते विभागामार्फत या ठिकाणी रस्ते विकासाची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. उपआयुक्त (परिमंडळ-5) देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List