रुपयाची पडझड, विमान कंपन्यांना फटका; डॉलरच्या चढ्या भावामुळे वाढला खर्च, एअरलाइन्स तिकीट महागणार?
>> सतिश केंगार
डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे हवाई प्रवास महाग होऊ शकतो. विमान कंपन्यांना निम्म्याहून अधिक खर्च डॉलरमध्ये करावा लागतो. डॉलरसाठी अधिक रुपये मोजावे लागतात. यामुळे विमान कंपन्यांच्या वर्षभराच्या खर्चात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये लीजवर घेतलेल्या विमानाचं भाडं, मेंटेनन्स, विमा इत्यादी खर्चांचा समावेश आहे. यातच आता विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की, जर रुपयाची घसरण थांबली नाही, तर त्यांना विमानाच्या तिकिटाचे दर वाढवावे लागतील.
रुपया पुन्हा घसरला
बुधवारी रुपया 17 पैशांनी घसरून 35.97 प्रति डॉलर या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रुपया कमजोर झाल्यामुळे एका वर्षात लीजिंग खर्च 3 टक्के वाढला आहे. विम्याचा खर्च 10 टक्के आणि मेंटेनन्स व इतर खर्च 5 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे विमान कंपन्यांच्या तोट्यात वाढ होत आहे. आयसीआरएच्या (ICRA) अंदाजानुसार, या वर्षी मार्चपर्यंत हिंदुस्थानी विमान उद्योगाचा तोटा 2 ते 3 हजार कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
विमान तिकीट महागणार?
रुपयाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे लीज भाडं वाढले आहे. हिंदुस्थानी विमान कंपन्या सध्या नैरो बॉडी विमानांसाठी महिन्याला 3.5 ते 4.5 लाख डॉलर (3.9 कोटी रुपये) आणि वाईल्ड बॉडी विमानांसाठी 9 ते 11 लाख डॉलर (9.5 कोटी रुपये) भाडं देत आहेत.
हिंदुस्थानी विमान कंपन्यांची कमाई रुपयांमध्ये होते, मात्र 50 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च डॉलरमध्ये होतो. सामान्यत: लीज भाडं 6 वर्षांसाठी निश्चित असते, पण रुप्याच्या घसरणीमुळे कंपन्यांना डॉलरमध्ये जास्त पैसे द्यावे लागतात. जर रुपयाची पडझड कायम राहिली, तर विमान कंपन्यांना भाडं वाढवावे लागेल, असे विशोक मानसिंह म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List