खो-खोच्या राष्ट्रीय संघांमध्ये महाराष्ट्राचा बोलबाला, पुरुषांच्या कर्णधारपदी प्रतिक वाईकर तर महिलांच्या कर्णधारपदी प्रियांका इंगळे
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 13 ते 19 जानेवारी दरम्यान पहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय पुरूष व महिला संघाची घोषणा झाली असून त्यात पुरुष संघात महाराष्ट्रातील पाच तर महिला संघात तीन खो-खोपटूंची निवड झाली आहे. पुरूष संघाच्या कर्णधारपदी प्रतिक वाईकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची यांची निवड झाली आहे.
खो-खो खेळात महाराष्ट्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीनंतर आज भारताचे पुरूष आणि महिलांचे संघ जाहिर करण्यात आले आहे. पुरूष संघात प्रतिक वाईकर (कर्णधार), सुरेश गरगटे, आदित्य गनपुले, रामजी कश्यप, अनिकेत पोटे तर महिला गटात प्रियंका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड यांची निवड झाली आहे. तसेच पुरूष संघाच्या प्रशिक्षकपदी शिरीन गोडबोले आणि महिलांच्या प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे.
भारतीय पुरूष संघ – प्रतीक वाईकर (कर्णधार), सचिन भार्गो, सिवा पोथिर रेड्डी, निखिल बी., सुमन बर्मन, पाबनी साबर, सुयर गरगटे, आदित्य गणपुले, आकाश कुमार, अनिकेत पोटे, मेहूल, रामजी कश्यप, गोवथम एम. के., शुभ्रमणी व्ही, एस. रॉकसन सिंग. राखीव – अक्षय भांगरे, राजवर्धन पाटील, विश्वनाथ जानकीराम.
महिला संघ – प्रियांका इंगळे (कर्णधार), भिलार देवजीभाई, चैत्रा बी, अंशु कुमारी, मिनु, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, निर्माला भाटी, निता देवी, सुभश्री सिंग, मेघी माझी, वैष्णवी बजरंग, मोनीका, नसरीन शेख, नाझी बीबी. राखीव – संपदा मोरे, रितीका सिलोरीया, प्रियांका भोपी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List