विरारचा आयर्न मॅन हार्दिक पाटीलचा रेकॉर्डब्रेक रेकॉर्ड, दहा आयर्न मॅन, एक अर्ध आयर्न मॅन; एक अल्ट्रा मॅन तर एक वर्ल्ड मेजर मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानच्या विजयाचा झेंडा

विरारचा आयर्न मॅन हार्दिक पाटीलचा रेकॉर्डब्रेक रेकॉर्ड, दहा आयर्न मॅन, एक अर्ध आयर्न मॅन; एक अल्ट्रा मॅन तर एक वर्ल्ड मेजर मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानच्या विजयाचा झेंडा

विरारचा आयर्न मॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटील याची नव्या विक्रमांची नोंद झाली आहे. हार्दिकने जर्मनी, फिलिपिन्स, ऑस्ट्रिया, अ‍ॅस्टोनिया, स्विडन, जपान, स्पेन, अमेरिका, मॅक्सिको आणि ऑस्ट्रेलिया या देशात जाऊन 10 पूर्ण आयर्न मॅन, एक अर्ध आयर्न मॅन, एक अल्ट्रा मॅन तर एक वर्ल्ड मेजर मॅरेथॉन जिंकत स्वतःचाच रेकॉर्ड मोडत रेकॉर्डब्रेक रेकॉर्ड केला आहे. हार्दिक पाटील हा फूल आयर्न मॅन स्पर्धा 35 वेळा पूर्ण करणारा दुसरा हिंदुस्थानी तर हाफ आयर्न मॅन 21 वेळा पूर्ण करणारा प्रथम हिंदुस्थानी ठरला आहे.

विरार येथील हार्दिक पाटील याने खेळात विशेष प्रावीण्य मिळवले आहे. फुल आयर्न मॅन ही स्पर्धा वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनद्वारे आयोजित केली जाते. चार किलोमीटर पोहणे त्यानंतर 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42.2 किलोमीटर धावणे असे आयर्न मॅन स्पर्धेचे स्वरूप आहे. मात्र ही स्पर्धा खेळाडूंना 17 तासात पूर्ण करावी लागते, तरच त्यांना आयर्न मॅनचा किताब मिळतो. हार्दिक पाटील खेळाडूंना याने फ्लोरिडातील अल्ट्रा मॅन 2024 ही स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करत जिंकली आणि महाराष्ट्राचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला. त्यानंतर न थांबता त्याने जर्मनी, फिलिपिन्स, ऑस्ट्रिया, अ‍ॅस्टोनिया, स्विडन, जपान, स्पेन, अमेरिका, मॅक्सिको आणि ऑस्ट्रेलिया या देशात जाऊन नऊ आयर्न मॅन स्पर्धा तर गोवा येथे एक अर्ध आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून स्पोर्ट्स स्थापन करण्याचे क्लब माझे प्रयत्न आहेत. त्या माध्यमातून पालघर जिल्ह्यासह हिंदुस्थानातील स्पर्धकांना आयर्न मॅन स्पर्धेत भाग घेण्याकरिता सहकार्य करेन- हार्दिक पाटील

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“क्या इसे अल्लाह हू अकबर कहते हुए काटा…?” सना खानचा हॉटेलमधला व्हिडीओ व्हायरल “क्या इसे अल्लाह हू अकबर कहते हुए काटा…?” सना खानचा हॉटेलमधला व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री सना खानने चित्रपटसृष्टीला अलविदा म्हटल्यानंतरचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. एकेकाळी कन्नड चित्रपट ‘कूल’सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मिनी स्कर्ट...
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत दैवी दर्शनाचा परमोच्च बिंदू; पृथ्वीवर भवानीशंकर रुपात अवतरणार महादेव
“राहुल गांधींना शिष्टाचार नाहीत,.”; कंगना यांनी ‘इमर्जन्सी’ पाहण्याचं केलं आवाहन, मिळाली अशी प्रतिक्रिया
‘याहूनही वाईट घडलं असतं..’; भीषण अपघाताच्या 13 दिवसांनंतर उर्मिला कोठारेची पोस्ट
Santosh Deshmukh Case – संतोष देशमुखांसारखं त्यांच्या भावालाही मारून टाकायचंय का? गुंडांच्या धमक्यांवर मनोज जरांगेंचा इशारा
Poco X7 Pro 5G and Poco X7 5G Price – दिसायला छान, किंमतही आवाक्यात; पोकोने लॉन्च केले 2 खास फोन
हेल्मेटशिवाय चालल्याबद्दल 300 रुपयांचा दंड, तक्रार दाखल