युजवेंद्र धनश्रीनंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या चर्चा, पत्नीसोबतचे फोटो केले डिलिट
हार्दीक पांड्या व शिखर धवन या क्रिकेटपटूंच्या घटस्फोटानंतर सध्या टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येत आहेत. या दरम्यानच आता आणखी एका क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.
टीम इंडियाचा फलंदाज मनीष पांडे व त्याची पत्नी अभिनेत्री अश्रिता शेट्टी यांच्यात सारेकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. मनीष पांडेच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून पत्नी आश्रिता शेट्टीचा फोटो डिलिट करण्यात आले आहे. आश्रिताने देखील तिच्या अकाऊंटवरील फोटो डिलिट केले आहेत. तसेच दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले आहे.
मनीष पांडे हा दक्षिणेकडील चित्रपटातील अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्यासोबत 2 डिसेंबर 2019 मध्ये लग्नबंधनात अडकला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List