सावधान पुण्यात सरकार पुरस्कृत कोयता गँग सक्रिय आहे, रोहित पवार यांची टीका

सावधान पुण्यात सरकार पुरस्कृत कोयता गँग सक्रिय आहे, रोहित पवार यांची टीका

उसन्या पैशाच्या वादातून कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्याने कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा भागात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

”पुण्यातील येरवडा येथील घटना बघता, सावधान पुण्यात सरकार पुरस्कृत कोयता गँग सक्रिय आहे. लाडक्या बहिणींनी स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी” असे म्हणावे लागेल. कडक कारवाई करू,कोणाला सोडणार नाही असले बोलबच्चन देणारे सरकार कोयता गँगवर कारवाई करणार आहे आहे की नाही? असा सवाल या पोस्ट मधून रोहित पवार यांनी सरकारला केला आहे.

शुभदा शंकर कोदारे वय 28 , रा. बालाजी नगर, कात्रज असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर) याला येरवडा पोलिसांनी अटक केली. शुभदा मूळची सातारची होती. ती डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीत कामाला होती. त्याच कंपनीत आरोपी कृष्णा कामाला असल्याने दोघांची ओळख होती. त्यांच्यात उसन्या पैशावरून वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारात शुभदा काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तेथे थांबलेल्या कृष्णाने तिच्याशी वाद घालून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘इस्रो’ने डॉकिंग प्रयोग पुढे ढकलला ‘इस्रो’ने डॉकिंग प्रयोग पुढे ढकलला
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 9 जानेवारीला होणारा स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पाडेक्स) पुन्हा पुढे ढकलला. दोन अवकाश उपग्रहांमध्ये जास्त अंतर...
अदानीचा बुलडोझर शिवसेनेने रोखला, वांद्र्याच्या भारतनगरमधील ‘एसआरए’च्या कारवाईला स्थगिती
पैठणच्या मोर्चात धस यांचा ‘डायरीबॉम्ब’!कराडचे पुण्यात पाच फ्लॅट, सात दुकाने, बार्शी आणि माजलगावात दीडशे एकर जमीन
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण; पोलिसांची सहा ठिकाणी झाडाझडती, गुह्याची व्याप्ती मोठी, नवीन बाबींचा उलगडा
सुप्रीम कोर्टासारखं बेशिस्त न्यायालय पाहिलं नाही! न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आसुड
दोन वर्षांनंतर सरकारला जाग, साडेपाच लाख शेतकऱ्यांना 535 कोटींची भरपाई
जगातील पॉवरफुल पासपोर्टची रँकिंग जाहीर, हिंदुस्थानचे स्थान घसरले