देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडली, लोकांच्या हितासाठी काम केलं; PM मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडली, लोकांच्या हितासाठी काम केलं; PM मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीमध्ये दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. तसेच हिंदुस्थानातील आर्थिक उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचे जनक देखील त्यांना म्हटले जाते. त्यांच्या निधनामुळे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत मनमोहन सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने सर्वात प्रतिष्ठित नेता गमावला आहे. सामान्य पार्श्वभूमी असताना सुद्धा त्यांनी देशाचे अर्थमंत्री पदापर्यंत भरारी घेतली. फक्त अर्थमंत्रीच नव्हे तर सरकारी यंत्रणेतील अनेक महत्त्वाच्या पदांचा कारभार त्यांनी पाहीला. अनेक वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी आपलं योगदान दिलं, आपली छाप सोडली. संसदेतील त्यांचा वावर हा अभ्यासपूर्ण होता. देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लाडकी बहीण योजनेबाबत आणखी काय माहिती? आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत आणखी काय माहिती? आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना सरकारकडून दर महिन्याला दीड हजार रुपये...
मोठी बातमी! उल्हासनगरचं शासकीय रुग्णालय 3 तासांपासून अंधारात, ऑपरेशन्स रखडले
खासगी बस अनियंत्रित झाल्याने नाल्यात कोसळली, आठ जणांचा मृत्यू; अनेक जखमी
सुझुकीचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांचे निधन, वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार, अजित पवार गटाच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Mumbai News – ताडदेवमध्ये दोन बाईकची समोरासमोर टक्कर, एक ठार; एक गंभीर जखमी
अनेक समस्यांवर औषधी गुळवेल शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर…