प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती तक्रार
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली निवडणूक आयुक्तांकडे ही तक्रार पाठवली आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आपच्या तक्रारीची चौकशी करण्यास, वस्तुस्थिती शोधून काढण्यास आणि आदर्श आचारसंहितेनुसार तातडीने योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
आम आदमी पक्षाने काय केले होते आरोप?
अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार संजय सिंह यांच्यासह निवडणूक आयोगात पोहोचले होते. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांच्या तक्रारींचे पत्र दिले. नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरुद्ध त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्या घरावर तात्काळ छापा टाकण्याची मागणी केली.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, प्रवेश वर्मा महिलांना उघडपणे पैसे वाटत आहेत, जे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. ते म्हणाले की, ”ते नोकरी मेळावे आयोजित करून आणि नोकऱ्यांचे आश्वासन देऊन मते मागत आहेत.” केजरीवाल यांच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना प्रवेश वर्मा यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List