118 जागांवर मतदार वाढले, फायदा फक्त भाजपलाच; राहुल गांधींनी महाराष्ट्र निवडणूक निकालांवर उपस्थित केले प्रश्न
आज काँग्रेस कार्यकारिणी (CWC) बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 72 लाख नवीन मतदार जोडले गेले. अशा 118 जागांपैकी भाजपने 102 जागा जिंकल्या. याचा अर्थ काहीतरी गडबड झाली आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की, “मतदार यादीत मोठा बदल करण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात 118 जागांवर 72 लाख मतदार जोडले गेले, त्यापैकी भाजपने 102 जागा जिंकल्या हे स्पष्ट आहे. यात काहीतरी चुकीचं घडलं आहे, असं राहुल गांधी या बैठकीत म्हणाले आहेत.”
सीडब्लूसीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष काय म्हणाले?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक नियमांमध्ये सरकारने केलेल्या दुरुस्तीबाबत प्रश्न विचारला आहे. मल्लिकार्जुन खरगे सीडब्लूसीच्या बैठकीत म्हणाले की, ”निवडणूक नियमात बदल करून सरकार काय लपवू पाहत आहे?, जे शेअर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत असून निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपला निवडणूक आयोगासारख्या सर्व घटनात्मक संस्था ताब्यात घ्यायच्या आहेत, पण आम्ही ही लढाई लढत राहू.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List