राज्यपाल नियुक्त आमदारप्रकरणी सुप्रिम कोर्टात दाद मागणार
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी दिली.
राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या चार वर्षांपासून रखडल्या. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मिंधे सरकारमुळे नियुक्त्यांचा घोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 7 ऑक्टोबरला दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला व याचिका फेटाळून लावली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List