पतंग उडवताना वीजेचा शॉक लागला, 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
पतंग उडवत असताना उच्च दाबाच्या वीजेच्या तारेचा शॉक लागल्याने एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सूरतमध्ये घडली आहे. सचिन परिसरातील गीता नगर सोसायटीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
गीत नगर सोसायटीत राहणाऱ्या चौधरी कुटुंबातील 13 वर्षाचा मुलगा सोसायटीजवळ पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना त्याचा दोरा सोसायटीजवळू जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजेच्या तारेत अडकला. दोरा काढण्याच्या प्रयत्नात मुलगा वीजेच्या खांबाच्या संपर्कात आल्याने त्याला शॉक लागला.
यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List