जगातील पॉवरफुल पासपोर्टची रँकिंग जाहीर, हिंदुस्थानचे स्थान घसरले
जगभरात सर्वात जास्त पॉवरफुल पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे, यासंबंधीची रँकिंग हेल्नी ग्लोबलने जाहीर केली आहे. या यादीनुसार, सिंगापूर नंबर वन स्थानावर असून जपान दुसऱया नंबरवर आहे. या रँकिंगमध्ये हिंदुस्थानचे स्थान मात्र घसरले आहे. या यादीत हिंदुस्थानला 85 वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थान 80 व्या स्थानावर होता. हिंदुस्थानी पासपोर्ट असलेल्या नागरिकांना व्हिसाशिवाय जगातील 57 देशांत प्रवास करता येतो. या देशामध्ये भूतान, बोलिव्हिया, अंगोला, फिजी, हैती, कझाकस्तान, केनिया, मॉरिशस, कतार, श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे. पहिल्या स्थानासाठी सिंगापूर व जपान या दोन देशांमध्ये नेहमीच टक्कर पाहायला मिळते. या यादीत पाकिस्तान 103, अफगाणिस्तान 106, बांगलादेश 100, श्रीलंका 96, म्यानमार 94, भूतान 90 व्या स्थानी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List