1950 प्रकल्प रोखले बँक खातेही गोठवले, महारेराची कारवाई म्हाडाच्या मुंबईतील दोन प्रकल्पांचा समावेश

1950 प्रकल्प रोखले बँक खातेही गोठवले, महारेराची कारवाई म्हाडाच्या मुंबईतील दोन प्रकल्पांचा समावेश

महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटली तरी कुठलीही माहिती अद्ययावत न करणाऱया 10,773 प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. या प्रकल्पांना अपेक्षित माहिती अद्ययावत करण्यासाठी महिनाभराचा कालावधी दिला होता. त्यापैकी कोणतीही माहिती अद्ययावत न करणाऱया 1950 प्रकल्पांना महारेराने स्थगिती दिली असून त्यांचे बँक खाते गोठवले आहे. तसेच त्यांच्यावर प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवरही निर्बंध लादले आहेत. यात म्हाडाच्या विक्रोळी टागोरनगर आणि कोपरी पवई अशा दोन प्रकल्पांचादेखील समावेश आहे.

महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक विकासकाला प्रकल्प कधी पूर्ण होणार याची तारीख आपल्या प्रस्तावात नोंदवावी लागते. या घोषित प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतर प्रकल्प पूर्ण झालेला असेल तर भोगवटा प्रमाणपत्रासह, प्रपत्र-4 सादर करावे लागते. प्रकल्प अपूर्ण असेल तर मुदतवाढीसाठीची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे किंवा प्रकल्प सुरू करण्यातच काही अडचणी आलेल्या असल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक विकासकाला तिमाही, वार्षिक असे कालबद्धरीतीने विहित विवरण प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

आणखी 3499 प्रकल्पांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू

माहिती अद्ययावत न करणाऱया 10 हजार 773 प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावल्या. या नोटिसींना 5324 प्रकल्पांनी प्रतिसाद दिला असून यापैकी 3517 प्रकल्पांनी भोगवटा प्रमाणपत्र सादर केले आहे. 524 प्रकल्पांनी प्रकल्पांच्या मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत. 1283 प्रकल्पांच्या प्रतिसादांची छाननी सुरू आहे. 1950 प्रकल्पांवर प्रकल्प स्थगितीची कारवाई केली आहे. याशिवाय काहीही प्रतिसाद न देणाऱया आणखी 3499 प्रकल्पांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Baba Siddiqui Case : पोलीसच वाचवताय आरोपींना, झिशान सिद्दीकींचा गंभीर आरोप, काय केला गौप्यस्फोट Baba Siddiqui Case : पोलीसच वाचवताय आरोपींना, झिशान सिद्दीकींचा गंभीर आरोप, काय केला गौप्यस्फोट
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही. ही हत्या बिश्नोई गँगनेच केली की इतर कारणांमुळे...
BMC निवडणुकीआधी मुंबईत ठाकरे गटासाठी एक चिंता वाढवणारी बातमी
“ती जिवंत होती, तिचा वाचवलं आलं असतं पण..”; प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
नव्वद तास कामाबाबत L&T कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर दीपिका पुन्हा भडकली; म्हणाली..
ठाण्याच्या सीपी टँक डम्पिंगवर कचऱ्याचे डोंगर, मिंध्यांच्या दुर्लक्षामुळे स्मार्ट सिटीचा कोंडमारा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत अनेक चुकीची कामे झाली! गणेश नाईक यांनी मिंध्यांना डिवचले
गुन्हेगारी रोखता येत नसेल तर काम सोडा! अजित पवार यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तंबी